बारामती : बारामती एमआयडीसीमध्ये दुचाकी आणि चारचाकीच्या डीकीमध्ये दारुच्या बाटल्यांचा साठा करुन त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये ७२ हजार रुपयांच्या दारुसाठ्यासह ९ लाख १२ हजार ८७७ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. मीना यांनाच याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन काही जण बेकायदेशीरपणे दारू ताब्यात बाळगून अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावर सापळा लावुन पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी चौघेजण चारचाकीच्या आणि दुचाकीच्या डिक्कीत दारू लपवून ठेऊन विक्री करताना आढळले. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.यामध्ये दहा प्रकारच्या दारुच्या प्रकारांची विक्री होत असल्याचे आढळले आहे.पोलीसांनी ७२ हजारांच्या दारुसाठ्यासह ९ लाख १२ हजार ८७७ रुपयांचा माल जप्त केला आहे. निखिल श्रीरंग चौधर (रा. रुई),ऋषिकेश नामदेव पारे (रा. तांदुळवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस अधिक्षक संदिप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार ,पोलीस निरीक्षक नारायण पवार ,पोलीस हवालदार संजय बंडगर यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला.———————————
दुचाकी आणि चारचाकीच्या डीकीमध्ये साठा केलेल्या दारुची ऑनलाईन विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 1:51 PM
चारचाकीच्या आणि दुचाकीच्या डिक्कीत दारू लपवून ठेऊन विक्री करताना आढळले.
ठळक मुद्देबारामती क्राईम ब्रँच पथकाचा छापा ७२ हजारांच्या दारुसाठ्यासह ९ लाख १२ हजार ८७७ रुपयांचा माल जप्त