गाजियाबाद - अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणात खळबळजनक खुलासा पोलिसांनी केला आहे. अल्पवयीन मुलीची सुटका केल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने अन्य एका साथीदाराच्या मदतीने फसवून मुलीचं अपहरण केले होते. त्यानंतर या अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने निकाह करण्याची तयारी केली होती.
अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस तक्रार केल्यानंतर उत्तराखंडहून मुलीला ताब्यात घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचं याआधीच २ मुलींसोबत विवाह झाला होता. मुख्य आरोपीला साथ देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून त्यालाही जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. आरोपीचं नाव सलमान असून तो अमरोहा येथील रहिवासी होता.
अमरोहाला राहणारा सलमान गाजियाबादच्या कविनगर क्षेत्रातील केशव गुंज, गोविंदपुरमच्या विविध भागात खासगी कंपन्यात नोकरी लावण्याबाबत कंसलटेंसी ऑफिस चालवतो. अटक केलेला आरोप २६ वर्षाचा आहे आणि पदवीधर आहे. आरोपीने याआधीच २ मुलींसोबत लग्न केले आहे. ज्यातील एक हिंदू आहे त्याशिवाय त्याचे अफेअर अनेक मुलींसोबत सुरू आहे. आरोपीला मुलेही आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अन्य महिलांच्या संपर्कात होता. आरोपी सलमाननं १४ डिसेंबरला कविनगर भागात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला पळवून नेले. त्यानंतर उत्तराखंडच्या उधमपूर नगरच्या काशीपूर इथं तो राहत होता. अटक केलेला आरोपी सलमानने अपहरण केलेल्या मुलीसोबत जबरदस्तीने लग्न करण्याच्या डाव आखला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने हा खुलासा केला. पोलिसांनी मुलीला सुखरुपपणे ताब्यात घेतले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्याचसोबत आरोपी सलमानसोबत मुर्शीद यालाही पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी प्लॅनिंगनुसार हिंदू मुलींना जाळ्यात ओढून त्यांना आपला शिकार बनवतो. पोलीस या घटनेत लव्ह जिहादसारखा हिंदू मुलींना फसवणारी टोळी तर यामागे नाही ना याचाही शोध घेत आहे.