पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागील सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तुरुंगात असताना लॉरेन्स बिश्नोईने दबंग खानच्या हत्येबद्दल बोलला होता. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ 2021चा आहे.लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ व्हायरलहा Exclusive व्हिडिओ 2021 सालचा आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीतील गुंडांना वेगवेगळ्या राज्यांतून मोक्का प्रकरणात रिमांडवर घेतले होते. व्हिडिओमध्ये लॉरेन्स आणि त्याच्यासोबत संपत नेहरा आहेत. लॉरेन्सचा जवळचा मित्र आणि राजस्थानचा गँगस्टर असलेल्या संपत नेहराने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेस केली. मात्र घटनेपूर्वीच हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली होती.
'सलमानला जोधपूरमध्ये मारणार'या व्हिडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोई म्हणत आहेत - जेव्हा आम्ही करू, तेव्हा कळेल. सलमान खानला मारणार, या जोधपूरमध्ये मारणार, तेव्हा त्याला कळेल. मी अजून काही केले नाही, विनाकारण मला यात ओढले जात आहे.
सलमानवर का नाराज आहे लॉरेन्स बिश्नोई?लॉरेन्स बिश्नोईने 2018 मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचवर्षी त्याचा मित्र संपत नेहरा यानेही सलमानच्या घराची रेकी केली होती. दबंग खानला टार्गेट करण्याचे सर्व नियोजन करण्यात आले होते. जेव्हापासून सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता. या दिवसापासून लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या मागे लागला आहे. गँगस्टर लॉरेन्स हा बिश्नोई समाजातील असल्यामुळे ते काळ्या हरणाला पवित्र प्राणी मानतात. त्यामुळेच सलमानने काळ्या हरणाची शिकार केल्यावर तो नाराज झाला होता. 'रेडी' चित्रपटाच्या शूटिंगनंतर या गुंडाने सलमान खानवर हल्ला करण्याचा कट आखला होता. तो कट अयशस्वी झाला होता. याचे कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोईला तेव्हा सलमानला मारण्यासाठी त्याच्या आवडीचे शस्त्र मिळाले नव्हते.तुरुंगात बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट आखण्यात आला होता ही कुख्यात टोळी पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्याचे नेटवर्क इतके मजबूत आहे की, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात राहून खून करू शकतो. जसे की गायक सिद्धू मुसेवालाच्या बाबतीत घडले. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. तुरुंगात, त्याने त्याचा साथीदार गोल्डी ब्रारसोबत पंजाबी गायक सिंधू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला. गायकाच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई याने फेसबुक पोस्टवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.