काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या याचिकांवर हायकोर्टात होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:07 PM2022-03-21T17:07:19+5:302022-03-21T17:07:38+5:30
1998 Blackbuck poaching case : सलमान खानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केसेस सुरू आहेत.
१९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेला परवानगी दिली आहे. अभिनेत्याशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सलमान खानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केसेस सुरू आहेत. सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ मध्ये राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्याला ६ दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते.
1998 blackbuck poaching case | Rajasthan High Court allows the transfer petition of actor Salman Khan. The pleas relating to the actor will now be heard in the High Court.
— ANI (@ANI) March 21, 2022
(File photo) pic.twitter.com/IBvaZ1JGEW
त्यानंतर या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या प्रकरणात सलमान खानला दोन वेळा जोधपूर तुरुंगात जावं लागलं आहे. या प्रकरणात सलमान खान व्यतिरिक्त तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, आणि निलम यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले होते.