विरार - कोरोनामुळे संपूर्ण देशात हाहाकार परसरला असताना पोलीस आणि आरोग्य कर्मचारी मात्र आपला जीव घोक्यात घालून लढाई लढत आहेत. या लढवय्यांनी कोरोना काळात अनेक ठिकाणी माणुसकी दाखवली. अशीच खाकी वर्दीतली माणूसकीचे दर्शन विरार येथे झाले आहे. लॉकडाऊनमुळे कोणतेही नातेवाईक अंत्यसंस्कारास येवू न शकल्याने विरारमधील एका इसमावर चक्क पोलिसानेच अत्यंसंस्कार केले. या अत्यंविधीचे दर्शन त्याच्या कुटुंबियांना व्हिडियो कॉलच्या माध्यमातून करून देण्यात आले. रक्ताच्या नात्याला जे जमलं नाही ते पोलिसाला जमलं.
विरार पूर्वच्या फुलपाडा परिसरात प्रमोद खारे (४२) हे रहात होते. ते अविवाहित असल्याने घरात एकटेच रहायचे. बुधवारी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विरार पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी खारे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. खारे यांची आई आणि भाऊ हे दिल्लीत तर दुसरा भाऊ हा कोलकाता येथे राहतो. लॉकडाऊनमुळे त्यांना प्रवासाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे पोलीस नाईक शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी विरारच्या स्मशानभूमीत खारे यांच्या कुटुंबातील प्रथेप्रमाणे खारे यांच्या मृतदेहावर अंत्यविधी केले. हा अंत्यविधी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून खारे यांच्या कुटुंबियांना दाखविण्यात आला.
काँग्रेसला दणका! ईडीने वांद्रे येथील १६.३८ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच