श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आता खरोखरच दृश्यम सिनेमासारखा पेच निर्माण झाला आहे. दृश्यम सिनेमामध्ये तारखेच्या घोळाने खुनाच्या प्रकरणातून त्या कुटुंबाला वाचविले होते. तसाच घोळ श्रद्धाच्या मर्डरमध्ये झाला आहे. एकीकडे आफताब आपले तोंड उघडण्याचे नाव घेत नाहीय. जे काही सांगत आहे ते प्रचंड घोळ निर्माण करणारे सांगत आहे. तसेच त्याने या काळात एवढी तयारी केलीय की बडेबडे पोलीस अधिकारीही हतबल झाले आहेत.
पुरावे सापडत नसताना श्रद्धाचा मर्डर नेमका कोणत्या तारखेला झाला, याचाही आता घोळ निर्माण होऊ लागला आहे. आफताबने श्रद्धाचा खून करून त्याच्या तासाभरातच झोमॅटोवरून बिर्याणी ऑर्डर केली होती, असे त्याने त्याच्या चौकशीवेळी सांगितले आहे. मात्र, झोमॅटोच्या रिपोर्टमध्ये आफताब १८ मे पर्यंत दोन जणांचे जेवण मागवत होता, त्यानंतर त्याने एकाचेच जेवण मागविण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे.
म्हणजेच श्रद्धाचा मृत्यू १८ मे रोजी झाला असे आजवर सांगितले जात असले तरी झोमॅटोच्या रिपोर्टवरून तो १८ मे रोजी न झाल्याचे दिसत आहे. इथेही पोलिसांची बाजू पडताना दिसत आहे. मेच्या अखेरीस आफताने झोमॅटोवरून खाणे मागविणे कमी कमी केल्याचेही या रिपोर्टमध्ये दिसत आहे. अशावेळी आफताबने याकाळात दुसऱ्या फुड डिलिव्हरी अॅपवरून खाणे मागविल्याची शक्यता बळावत आहे. यातून आफताबला एक व्यक्तीच जेवण करत असल्याचे भासवायचे होते, असा संशय पोलिसांना आहे.
आफताब ने आतापर्यंत दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 18 मे रोजी रात्री 9 च्या सुमारास श्रद्धाची हत्या केली. तर, आफताबच्या फोन रेकॉर्डवरून असे दिसून येते की 18 मे रोजी त्याने त्याच रात्री 10 वाजता जेवणाची ऑर्डर दिली होती. अशा परिस्थितीत एकतर तो हत्येच्या तारखेबद्दल खोटे बोलत असल्याचा पोलिसांना संशय आहे. किंवा त्याने ही घटना नियोजित पद्धतीने घडवून आणली आहे.
आफताबने सांगितले की, त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, ज्याबद्दल श्रद्धाला माहित पडले होते. यावर आफताबने श्रद्धाचे इतर मुलांशी संबंध असल्याचा आरोपही केला होता, यावरून दोघांमध्ये भांडण झाल्याचे त्याने पॉलिग्राफ चाचणीत सांगितले आहे.