शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 23:05 IST

व्हिसाचे उल्लंघन करणे, अमली पदार्थ व्यवहार, जामीन अटींचे उल्लंघन  आणि मारामारी अशा गुन्ह्याशी अनेकवेळा संबंध आलेला अटाला हा कळंगूट येथे राहत असताना रशीयन नागरिकाला मारहाण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती.

ठळक मुद्दे या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याने धाव घेतली होती.९ मार्च २०१० मध्ये त्याला अटक झाली होती तर  ४ सप्टेंबर २०१० मध्ये त्याची सशर्तजामीनवर सुटका झाली होती. नंतर जामीन नियमाचे उल्लंघन करून तो देशाबाहेर पळून गेला होता.

वासुदेव पागी

पणजी: एकेकाळी गाजलेल्या ड्रग्स - पोलीस साटेलोटे प्रकरणात अटक करण्यात आलेला इस्रायली नागरीक यानिव बेनाईम ऊर्फ अटाला हा त्या प्रकरणात केवळ ४ महिने तुरुंगात राहिला होता. तोच अटाला एका मारामारीच्या प्रकरणात एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात अडकला आहे. त्याच्या जामीन अर्जावर  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात १० रोजी सुनावणी होणार आहे.

व्हिसाचे उल्लंघन करणे, अमली पदार्थ व्यवहार, जामीन अटींचे उल्लंघन  आणि मारामारी अशा गुन्ह्याशी अनेकवेळा संबंध आलेला अटाला हा कळंगूट येथे राहत असताना रशीयन नागरिकाला मारहाण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती. २४ एप्रील २०२० रोजी त्याला अटक क रण्यात आली होती. भारतीय दंडसंहिता कलम ३०७ अंतर्गत  खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु हे कलम नंतर उशिरा लावण्यात आले होते.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याने धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी एक सदस्यीय खंडपीठासमोर मंगळवारी होणार होती, परंतु ती होवू शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ही १० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.अटक करण्यात आल्यापासून आतापर्यंत जवळ जवळ एक वर्ष आणि २ महिने अटाला तुरुंगात आहे. मुख्य म्हणजे एका मागे एक अशी गुन्ह्यांच्या शृंखलेत अडकलेला अटालाचा हा तुरुंगात घालविलेला सर्वाधिक काळ आहे. यापूवी २०१० मध्ये गोव्यातील गाजलेल्या ड्रग्स प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती. किंबहुना त्याच्या अटकेनंतरच हे ड्रग्स प्रकरणाची व्यापकता उघडकीस आली होती. हे प्रकरण नंतर सीबीआयकडेही सोपविण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतरही त्याला केवळ ४ महिन्याहून अधिक काळ तुरुंगात रहावे लागले नव्हते. ९ मार्च २०१० मध्ये त्याला अटक झाली होती तर  ४ सप्टेंबर २०१० मध्ये त्याची सशर्तजामीनवर सुटका झाली होती. नंतर जामीन नियमाचे उल्लंघन करून तो देशाबाहेर पळून गेला होता. नंतर इंटरपोलच्या मदतीने त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती, परंतु नंतर लवकरच तो सुटला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थjailतुरुंगgoaगोवाPoliceपोलिसIsraelइस्रायल