सुशांत प्रकरणात रियाच्या ड्रग गॅंग आणि ड्रग स्मगलर यांच्यातील संभाषणाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज तकच्या हाती लागलेल्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून असे दिसते की, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा खरंतर सुशांतचा ड्रग्ज मॅनेजर बनला होता. ड्रग पेडलर्सच्या सीडीआरमध्ये सॅम्युअलचा मोबाईल क्रमांक बर्याच वेळा दिसून येत आहे आणि त्याने ड्रग्ज विक्रेत्यांशी तासन् तास चर्चा केली असल्याचं उघडकीस आलं आहे.रिया चक्रवर्तीची ड्रगशी जोडलेली मंडळी मुंबईतील विविध बदनाम ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. जेव्हा एनसीबीने या अंमली पदार्थ तस्कर आणि सुशांतच्या कर्मचार्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी सुरू केली, तेव्हा एकामागून एक धक्कादायक खुलासे होऊ लागले. सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा हा सर्व ड्रग तस्करांच्या संपर्कात होता. रिया आणि सुशांतच्या सांगण्यावरून ड्रग्जची व्यवस्था करत असे हे पुढे उघडकीस आले.वास्तविक, या ड्रग्ज जाळ्यात अडकलेल्या मंडळींचे आपापसांत मोबाइल कनेक्शन होते. जैद आणि ड्रग्ज सप्लायर करमजीत याच्या सीडीआरने हे उघड केले आहे. जैद आणि सॅम्युअल मिरांडा बर्याच दिवसांपासून संपर्कात होते. तीन फोन कॉलदरम्यान दोघांनी ७२ मिनिटांपर्यंत संभाषण केले. सप्टेंबर ते मार्च या काळात सॅम्युअल मिरांडा यांच्यातील संभाषणाचे पुरावे समोर आले आहेत. १७ कॉल दरम्यान३०० मिनिटे चर्चा त्यांच्यात झाली होती. जैद, बासित, रिषभ ठक्कर, करमजीत आणि करण अरोरा एकमेकांच्या संपर्कात होते हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.मोबाइल फोनवरील संभाषणांमुळेच रियाविरूद्ध केस इतकी भक्कम झाली की तिच्याकडून ड्रग्जची जप्ती झालेली नसतानाही तिला कोर्टाकडून जामीन मिळालेला नाही. सुशांतचे कर्मचारी आणि अमली पदार्थ तस्करांच्या सीडीआरच्या तपासणीनंतरच एनसीबीने मुंबई आणि गोव्यातील अमली पदार्थ तस्करांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या सीडीआरमधून अटक करण्यात आरोपींची संख्या केवळ येथेच थांबणार नाही, तर येत्या काळात अधिक लोक एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. या क्षणी, मायानगरी मुंबईच्या अनेक नशेबाजांची झोप उडालेली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या
दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक
‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."
पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप
रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं
उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे
इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता