शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

Sanjay Raut Arrested: संजय राऊत ईडी चौकशीत सहकार्य करत नव्हते; आज PMLA कोर्टात करणार हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 5:48 AM

Sanjay Raut Arrested by ED Latest News Updates:राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी रविवारी सकाळी सात वाजताच दाखल झाले होते. त्यांनी सोबत पोलिसांचा आणलेला फौजफाटा पाहता राऊत यांना ताब्यात घेणार असल्याचे संकेत मिळत होते.

शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने मध्यरात्री अटक केली आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चाललेल्या चौकशीत राऊत हे ईडीला सहकार्य करत नव्हते. यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी रविवारी सकाळी सात वाजताच दाखल झाले होते. त्यांनी सोबत पोलिसांचा आणलेला फौजफाटा पाहता राऊत यांना ताब्यात घेणार असल्याचे संकेत मिळत होते. मैत्री बंगल्यावर सकाळी सात ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. यानंतर राऊत यांना ईडीने बलार्ड एस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात नेले. तिथेही रात्री उशिरा पर्यंत चौकशी करण्यात आली. या चौकशीत राऊत सहकार्य करत नसल्याने त्यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राऊत यांना आज मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. ईडी त्यांची कोठडी मागणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत कारवाईवेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी होते.

दिवसभरात काय घडलं?भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते. त्यांपैकी केवळ एकदाच ते चौकशीसाठी हजर राहिले. तीन वेळा ते गैरहजेर राहिल्यानंतर आज अखेर ईडीचे पथक थेट संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतली आणि त्यांची साडे नऊ तास चौकशी केली. त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीचे अधिकारी संजय राऊतांना मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर तेथेही त्यांची सुमारे ८ तास चौकशी करण्यात आली आणि अखेरीस त्यांना अटक केल्याची बातमी मिळाली.

संजय राऊतांना भाजपा घाबरली; बंधू सुनील राऊतांची प्रतिक्रियासंजय राऊत यांना अटक केल्यानंतर सुनील राऊतांनी प्रतिक्रिया दिली. "भारतीय जनता पार्टी संजय राऊतांना घाबरली. संजय राऊतांना बोगस केस बनवून अटक करण्यात आली आहे. त्यांची उद्या सकाळी वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल. पण संजय राऊतांना चुकीच्या आरोपांखाली अडकवण्यात आले आहे. आम्ही न्यायायलात नक्कीच लढा देऊ. गोरेगांव च्या पत्राचाळ प्रकरणाचे आरोप करून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही नक्कीच या विरोधात आवाज उठवू", अशी माहिती बंधू सुनील राऊत यांनी दिली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेना