उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरमध्ये लाच घेताना एका पोलीस अधिकाऱ्याला अॅंटी करप्शनने रंगेहाथ पकडलं. यानंतर त्याला अटक करण्यात आली. या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचं नाव राम मिलन यादव आहे आणि तो धनघटा पोलीस स्टेशनमध्ये सेकंड ऑफिसर आहे अॅंटी करप्शनने त्याला १० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे.
राम मिलन यादव कर्माखान गावात राहणाऱ्या अब्दुल्ला खानचा रिपोर्ट बरोबर करण्यासाठी १० हजार रूपये मागत होता. यासााठी तो अब्दुल्लाला पुन्हा पुन्हा फोन करत होता. ज्याला वैतागून अब्दुल्लाने अॅंटी करप्शन ब्युरोला पूर्ण कहाणी सांगितली. यावर कारवाई करत त्यांनी राम मिलन यादव याला त्याच्या घरातून लाच घेताना अटक केली.
खास बाब म्हणजे जेव्हा अधिकारी राम मिलन यादवला अटक करण्यात आली तेव्हा तो बनियान आणि टॉवेल गुंडाळून होता. त्याला त्याच स्थितीत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पोलिसाच्या वर्दीला अपमानित करणाऱ्या राम मिलन यादव याला बनियान आणि टॉवेलमध्येच तुरूंगात पाठवण्यात आलं. सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत अब्दुल्लाने सांगितलं की, उप निरीक्षक राम मिलन यादव पुन्हा पुन्हा करत होता. पण मला पैसे द्यायचे नव्हते. यामुळे मी अॅंटी करप्शन टीमला संपर्क केला आणि अॅंटी करप्शन टीमने राम मिलन यादवला रंगेहाथ अटक केली.