शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

सरस्वती हत्याकांडाचा क्रूरकर्मा सानेविरोधात आरोपपत्र दाखल; ६२ साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 7:30 AM

सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मीरा रोड : मीरा रोडमधील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि सर्वांना हादरवणाऱ्या सरस्वती वैद्य (३२) हत्याकांडाचा क्रूरकर्मा आरोपी मनोज साने (५६) विरुद्ध नयानगर पोलिसांनीठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मूळचा बोरीवलीच्या बाभईचा असलेला मनोज साने हा सरस्वतीसोबत मीरा रोडच्या गीतानगरमधील गीता आकाशदीप इमारतीत भाड्याने २०१७ पासून राहत होता. विषारी कीटकनाशक देऊन ४ जून २०२३ रोजी सरस्वतीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहासोबत नग्न फोटो काढले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धा वालकर हत्याकांडामधून तसेच इंटरनेटवरून शोधले.  मृतदेहाचे कटरने तुकडे करून कूकरमध्ये शिजवले व काही भाजले. थोडे तुकडे त्याने बाहेर फेकले. ६  जूनच्या रात्री पोलिसांना शेजाऱ्यांकडून समजल्यावर त्याला पकडले.

पोलिसांना घरातून सरस्वतीचे ३० ते ३५ तुकडे, कटर, कीटकनाशक बाटली, कूकर, टोप व दोघांचे मोबाइल आदी सापडले. मोबाइलमधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. डिसेंबर २०२२ पासून दोघांमध्ये खटके उडत होते. १० वर्षे गोष्ट लपवून ठेवल्याचा जाब सरस्वतीने विचारला होता. मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहणे, अन्य महिलांशी चॅटिंग करणे समोर आले. साने याला दुर्धर लैंगिक आजार आहे का? व ती माहिती सरस्वतीपासून लपवून ठेवल्यावरून वाद सुरू झाल्याची शक्यता त्यावेळी पोलिस सूत्रांनी सांगितली होती.

१,२०० पानांचे आरोपपत्रतत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. साने सध्या कारागृहात आहे. सोमवार, ४ सप्टेंबर रोजी नयानगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात सानेवर हत्येसह विविध कलमांखाली गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र असून, त्यात साने व सरस्वती लिव्ह इनमध्ये राहात होते. साने याने आधी विष देऊन हत्या केली. तिचे तुकडे करण्यासाठी वापरलेली उपकरणे आदी अनेक पुरावे पोलिसांनी नमूद केले आहेत. तिच्या बहिणी, शेजारी, डॉक्टरपासून ६२ साक्षीदार नमूद केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे