हडपसर : राजकीय वादातुन मनसेचे उपविभागाध्यक्ष विशाल ढोरे यांना जीवे मारण्याची सुपारी दिलेल्या किलरला हडपसरपोलिसांनी सापळा रचून पकडले. पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन आरोपी अटक असून बाकीचे फरार आहेत. या प्रकरणामागे मांजरीचा सरपंच व सदस्य मुख्य सूत्रधार आहेत.मनसे उपविभागाध्यक्ष विशाल ढोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. आरोपींमध्ये मोसीन पठाण, (वय २०), शाहिद पटेल, इरफान पठाण (रा.सर्व वाघोली), दीपक भंडलकर, शिवराज घुले (वय ४२), प्रमोद कोद्रे (वय ४२) संतोष भंडारी (वय ३२) यांचा समावेश आहे. हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विशाल ढोरेच्या दिशेने एक गोळी झाडली होती. त्यावेळी एक मोकळी पुंगळी रस्त्यावर सापडली होती. रविवारी( दि. २१) सायंकाळी ६ वाजता ढोरे यांचा फोन सुनील तांबे यांना आला की, एका व्यक्तीने त्यांना फोन करून त्यांच्या खुनाची सुपारी घेतली असल्याचे सांगितले. तेव्हा तातडीने पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, संजय चव्हाण यांच्या दोन टीमला ट्रॅप लावायला सांगितले होते. त्यांच्या कारवाईमध्ये एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. आणि एक आरोपी ताब्यात घेतला होता. रात्री उशिरा दुसरा आरोपी ताब्यात घेतला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केला असता त्यांनी विशाल ढोरे याच्या खुनासाठी १० लाखाची सुपारी घेतल्याची कबुल केले होते. या सुपारीचे मुख्य सूत्रधार शिवराज घुले व प्रमोद कोद्रे यांनी आरोपींशी फोनवर बोलणी करून मारण्यास सांगितले होते. शिवराज घुले भाजपचे मांजरीचे सरपंच असून प्रमोद कोद्रे सदस्य आहेत. विशाल ढोरे व सरपंच घुले यांच्यात राजकीय वाद आहेत. त्यांच्या राजकीय वितुष्टाचे पर्यावसान सुपारी देण्यात झाले........................ शिवराज घुले व त्याच्या साथीदाराने सुपारी दिल्यानंतर मारेकरी ४ दिवस माग काढत होते. फियार्दी विशाल ढोरेने पोलीस अधिकारी सुनील तांबे यांना फोन केल्याने पोलिसांनी गांभीयार्ने कारवाई केली व आरोपी गजाआड केले. आरोपीनी वाघोली येथे थमार्कोल पुतळा करून गोळ्या मारण्याची प्रॅक्टीस केली होती.
सरपंचानेच दिली विरोधकाला मारण्याची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 9:01 PM
राजकीय वादातुन मनसेचे उपविभागाध्यक्ष यांना जीवे मारण्याची सुपारी दिलेल्या किलरला हडपसर पोलिसांनी सापळा रचून पकडले.
ठळक मुद्देया प्रकरणामागे मांजरीचा सरपंच व सदस्य मुख्य सूत्रधार खुनासाठी १० लाखाची सुपारी घेतल्याची कबुलआरोपीनी वाघोली येथे थमार्कोल पुतळा करून गोळ्या मारण्याची केली प्रॅक्टीस