कल्याण: सेवानिवृत्त मोटरमन प्रमोद बनोरीया यांचा मृतदेह राहत्या घरात रक्ताच्या थारोळयात तर पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील निखिल हाईटस या हाय प्रोफाइल सोसायटीत रविवारी उघडकीस आली होती. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना पोलिसांनी घातपाताचाही संशय व्यक्त केला होता. परंतू तपासात वडीलांची हत्या करून त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव मुलगा लोकेशने रचल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे शुक्रवारी रात्री घडलेली ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. वडीलांची हत्या करून तो 24 तास बसला मृतदेहासमोर बसला होता.
बनोरीया कुटुंबाचे निखिल हाईटस सोसायटी येथे चौथ्या मजल्यावर वास्तव्याला होते. रविवारी सकाळी लोकेशने सोसायटीच्या वॉचमनला फोन करून रूग्णवाहीका हवी असल्याचे सांगितले. संशय आल्याने वॉचमनने ही बाब सोसायटीतील अन्य रहिवाशांना सांगितली. त्यांनी बनोरीया यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना एकच धकका बसला. कौटुंबिक वादातून वडीलांनी आमच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वत:वर चाकूने वार करून आपले जीवन संपविले अशी माहीती जखमी अवस्थेतील लोकेशने पोलिसांना दिली होती. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात लोकेशनेच वडीलांची हत्या केल्याचे समोर आले. वडीलांच्या शरीरावर 4 ते 5 वेळा चाकुने वार करून त्यांची हत्या केली तर आईवर ही वार करून तीला गंभीर जखमी केले आणि स्वत:च्या गळयाच्या ठिकाणी जखम करून घेतल्याची कबुली लोकेशने दिल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक उमेश माने-पाटील यांनी दिली. सध्या जखमी लोकेशसह आई कुसुमवर शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकेश विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
कपड्यांशिवाय व्हिडीओ बनवण्यास नकार दिला; अभिनेत्रीने मोलकरणीस चप्पलने केली मारहाण
मुलीच्या नावावर आईनं कॉलेजमध्ये घेतला प्रवेश; अनेक युवकांसोबत बनवले संबंधदोघेही एकत्र दारू प्यायचेबनोरीया पिता-पूत्र नेहमी एकत्र दारू प्यायचे. तेव्हा त्यांच्यात वाद व्हायचे. शुक्रवारी देखील त्यांच्यात दारू पिताना मोठा वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली. लोकेश हा बीकॉमचे शिक्षण घेत होता. परंतू तो व्यसनाच्या आहारी गेला होता अशीही माहीती मिळत आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त मोटरमन होते तर आई गृहीणी होती. ती मानसिक आजारी असल्याचीही माहीती समोर आली आहे.