मेरठमधील सौरभ हत्याकांडात एकामागून एक मोठे खुलासे होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करण्यापूर्वी आरोपींनी याची एक आठवडा रिहर्सल देखील केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कानने साहिलसोबत मिळून सौरभची हत्या करण्याचा प्लॅन केला होता.त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी मुस्कानने सौरभला घरी बोलावलं, साहिल आधीच तिथे उपस्थित होता.
मुस्कानने सर्वात आधी सौरभच्या मानेवर चाकूने वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर साहिलने सौरभची हत्या केली. हत्येनंतर दोघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला होता. साहिलने सांगितलं की, त्याला मृतदेह जमिनीत पुरायचा होता. हे काम पार पाडण्यासाठी त्याने आधीच सर्व तयारी केली होती. पण नंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिक ड्रममध्ये ठेवले.
खुनाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर साहिल आणि मुस्कानला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. जिथे साहिलला बॅरेकमधील कैद्यांनी मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसून आल्या. तुरुंग प्रशासनाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला.
मुस्कान आणि साहिल यांचे बऱ्याच काळापासून संबंध होते. साहिल अनेकदा मुस्कानला भेटण्यासाठी तिच्या घरी येत असे. साहिलने पोलिसांना सांगितलं की, तो मुस्कानला सौरभपासून दूर ठेवू इच्छित होता. त्याला मुस्कान आणि सौरभमधील वाढती जवळीक आवडली नाही. साहिलने सौरभ आणि मुस्कानच्या नाचण्यावरही आक्षेप घेतला होता. मत्सर आणि द्वेषामुळे त्याने ही हत्या केली.
मुस्कानचं साहिलपेक्षा दुसऱ्या कोणावर तरी होतं जास्त प्रेम; आईने सांगितलं 'ते' सत्य
सौरभची पत्नी मुस्कानने बॉयफ्रेंड साहिलसह सौरभची हत्या केल्याचा आरोप आहे. पण आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे की, मुस्कानचं साहिल नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीवर खूप प्रेम होतं आणि ती त्या व्यक्तीचा खूप आदर करायची. मुस्कानची आई कविता रस्तोगीने याबाबतचं सत्य सांगितलं आहे.