उत्तर प्रदेश येथील सौरभ हत्याकांडात मेरठमधील मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोन्ही आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुस्कान आणि साहिल सुरुवातीला सौरभचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून विल्हेवाट लावण्याचा विचार करत होते, पण त्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी ड्रममध्ये विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला.
मेरठ पोलिसांनी सौरभच्या घरातून रक्ताने माखलेली सुटकेस आणि इतर अनेक पुरावे जप्त केले आहेत, त्यानंतर हा संशय निर्माण झाला आहे.
लेकीनं दिला लग्नास नकार, संतप्त युवकानं तिच्या वडिलांना संपवलं; दिवसाढवळ्या घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, पती सौरभची हत्या केल्यानंतर मुस्कान हिमाचल प्रदेशला गेली आणि तिने तिचा प्रियकर साहिलशी मंदिरात लग्न केले. या ठिकाणीच ते जास्त दिवस राहिले.
दरम्यान, मुस्कान आणि साहिलचे जे नवीन फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावरून ते त्यांना सौरभच्या हत्येचा किंचितही पश्चात्ताप नाही; खरं तर, या फोटोमध्ये, ते हत्येनंतर दारू पिऊन मजा करताना दिसत आहेत.
मंगळवारी, मेरठ पोलिसांनी पुन्हा एकदा सौरभच्या भाड्याच्या घराची चौकशी केली. पोलिसांनी खुनाचे ठिकाण म्हणजेच गुन्ह्याचे ठिकाण आधीच सील केले होते. त्यानंतर त्या खोलीची अधिक तपशीलवार फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. पोलिसांनी घराच्या भिंती आणि दरवाजे तसेच खोलीत ठेवलेल्या विविध वस्तूंची तपासणी केली आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी विविध नमुने गोळा केले.
पोलिस पथकाला सौरभच्या घरातून एक सुटकेसही सापडली ज्यावर रक्ताचे डाग होते. सौरभची हत्या केल्यानंतर, मुस्कान आणि साहिल यांनी आधी त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी सौरभचा मृतदेह ड्रममध्ये टाकला आणि सिमेंटने सील केला, असा संशय आहे. हे प्रकरण कधीच उघडकीस येणार नाही अस दोघांना वाटले होते. पण ड्रममधून येणारा वास आणि मुस्कानच्या स्वतःच्या कबुलीजबाबामुळे हा गुन्हा उघडकीस आला. पोलीस पथकाने सौरभच्या घरातून उशी, चादर, भांडी इत्यादी अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.