'मला माझ्या बायकोपासून वाचवा'...बायकोविरोधात पतीने घेतली पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:19 PM2022-03-04T20:19:20+5:302022-03-04T21:16:40+5:30
Husband's complaint against his wife :पत्नीच्या छळाला कंटाळून भिंड जिल्ह्यातील भरौली तालुक्यामधील रहिवासी मनोज कुमार याने पोलिसांकडे आपबिती मांडली आहे.
'मला माझ्या बायकोपासून वाचवा'... मध्य प्रदेशात राहणाऱ्या एका पतीने आपल्या बायकोविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात जाऊन पती थेट डीएसपींना जाऊन भेटला. पत्नीच्या छळाला कंटाळून भिंड जिल्ह्यातील भरौली तालुक्यामधील रहिवासी मनोज कुमार याने पोलिसांकडे आपबिती मांडली आहे.
मध्य प्रदेशमधील पतीची ही तक्रार लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. स्वत:ला पीडित असल्याचे सांगून मनोजने पत्नी सोनम त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. मनोजची पत्नी त्याला वेळेवर जेवणही देत नाही, असा देखील आरोप मनोजने केला आहे.
केक कापून केला एक्स गर्लफ्रेंडवर हल्ला, ब्रेकअप नंतरची जवळीक पडली महागात
अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेला अर्धनग्न करून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
मनोजच्या पत्नीने इतक्यावरच न थांबता हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी त्याला गोवण्याची धमकीही देत आहे. पुढे मनोज सांगतो की, त्याने आपल्या पत्नीबद्दल तिच्या आईवडिलांकडे बऱ्याचदा तक्रार केली आहे. मात्र, कोणीही त्याच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही. मनोजच्या म्हणण्यानुसार, भरौली पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.