शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

नागपुरातील शांतीनगरात बचत गटाचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:37 PM

बचत गट तसेच फंड योजनेच्या नावाखाली ठिकठिकाणच्या महिला-पुरुषांकडून लाखो रुपये गोळा करून एका महिलेने या रकमेचा अपहार केला.

ठळक मुद्देफंड योजनेखाली रक्कम हडपली : महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बचत गट तसेच फंड योजनेच्या नावाखाली ठिकठिकाणच्या महिला-पुरुषांकडून लाखो रुपये गोळा करून एका महिलेने या रकमेचा अपहार केला. नियोजित मुदतीनंतरही आपली रक्कम परत करण्यास ती महिला टाळाटाळ करीत असल्याने अखेर जमावाने शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. योगिता गजानन कोठाळकर (वय ३७) असे आरोपी महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.योगिता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर कॉलनीत राहते. जून-जुलै २०१८ मध्ये तिने हरसिद्धी फंड योजना सुरू केली. त्यात विविध लोकांकडून महिन्याला रक्कम जमा केली जात होती. विशिष्ट मुदतीनंतर दामदुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष तिने दाखवले होते. गुंतवणूकदाराला मध्ये अडचण आल्यास कर्जाच्या रूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचीही थाप ती मारत होती. त्यात अनेकांनी रक्कम जमा करणे सुरू केल्याने योगिताने नंतर माता बचत गट स्थापन करून ५० हजार रुपयांचे कर्ज उचलले. सुधीर बळवंत कामडे (वय ४१, रा. प्रेमनगर) यांनी तसेच परिसरातील अनेकांनी तिच्याकडे फंड जमा केला. प्रारंभी रक्कम जमा करण्याची तसेच परतफेडीची मुदत ६ जुलै २०१८ ते ५ सप्टेंबर २०१९ अशी होती. कामडे आणि अन्य १३ जणांनी मुदत संपल्यानंतर आपली रक्कम परत मागणे सुरू केले. सुरुवातीला वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळणाऱ्या योगिताने नंतर वेगवेगळी थाप मारणे सुरू केले. ती रक्कम परत करीत नसल्याने काही जणांनी तिच्यावर दबाव वाढवला. त्यामुळे योगिताने रक्कम देण्यास चक्क नकार दिला. तिने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे नागरिकांनी शांतीनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी बरेच दिवस तपास केल्यानंतर अखेर गुरुवारी या प्रकरणी योगिता कोठाळकरविरुद्ध कलम ४०६, ४१८, ४२० तसेच सहकलम ८, ३ एमपीआयडी अन्वये गुन्हा दाखल केला.पीडितांमध्ये खळबळयोगिता कोठाळकरकडे रक्कम जमा करणारी मंडळी गोरगरीब आहे. मुलांचे शिक्षण, लग्न तसेच आवश्यक कामांना नजरेपुढे ठेवून अनेकांनी पोटाला पीळ देत योगिताकडे रक्कम जमा केली. अनेकांनी रोजमजुरी करून आपली रक्कम तिच्या हवाली केली. तिने ही रक्कम गिळंकृत केल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी