मुंबई - दक्षिण मुंबईतील दुकानांत दरोडा टाकून पळालेल्या दोन सराईत गुंडाना पकडण्यात शिवडी पोलिसांनी यश आले आहे. नदीम शकिर खान, मोहम्मद नफी नूर मोहम्मद शेख अशी या दोन आरोपींची नावे आहे. या दोघांना न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एल. टी. मार्ग परिसरातील अब्दुल रहमान स्ट्रिट येथील एका रविवारी राञी दरोडा टाकला होता. त्यावेळी दुकानातील तिजोरी उघडता येत नसल्यामुळे दोघांनी तिजोरी घेऊन तेथून पळ काढला. दोघेही शिवडी परिसरात येऊन एका निर्जनस्थळी तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करत होते. माञ, तिजोरी काही केल्या तुटत नव्हती. दोघेही तिजोरी तोडण्यात व्यस्थ असताना शिवडी पोलिसांची गस्तीवर असलेली गाडी त्यांच्याजवळ केव्हा आली हे त्यांना कळाले नाही. गाडीला पाहून दोघांनी तिजोरी लपवली. पोलिसांना दोघांवर संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली. दोघेही असमाधानकारक उत्तरे देत होते. त्याचवेळी एका पोलिसाची नजर तिजोरीवर पडली. पोलिस त्यांच्याजवळ जाणार तोच दोघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी दोघांना काही अंतरावर गाठले.
पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली असता. दोघांनी एल. टी. मार्ग परिसरात एका दुकानावर दरोडा टाकल्याची कबूली दिली. पोलिसांनी चोरीची तिजोरी उघडली असता. त्यात 8 लाख 9 हजार रुपये होते. या चोरीची माहिती पोलिसांनी एल. टी. मार्ग पोलिसांना देत ज्या दुकानात या दोघांनी चोरी केली त्या दुकानदाराला चौकशीला बोलवून चोरीचे सामान सूपूर्द करण्यात आले आहे. न्यायालयाने या दोघांना 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांचा ताबा शिवडी पोलिसांनी एल. टी. मार्ग पोलिसांना दिला आहे.