सावंतवाडी : सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून बेपत्ता साक्षीदार कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी (29 रा.उभाबाजार सावंतवाडी)यानेच हे हत्याकांड केल्याची कबुली दिली असून हत्याकांडासाठी वापरण्यात आलेले सुरा ही पोलीसांनी त्याच्या घरातून जप्त केला आहे.हे हत्याकांड कर्जबाजारी असल्यानेच घडवून आणण्यात आले असून सोन्याची चेन सह अन्य दागिने विकून हे कर्ज फेडण्याचा आरोपीचा उद्देश असल्याचे तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.
सावंतवाडी उभाबाजार परिसरात निलीमा खानविलकर व शालिनी सावंत या दोन वृध्द महिलांची निर्घुण हत्या झाली होती या हत्याकांडाने सिंधुदुर्ग जिल्हा हादरून गेला होता सिंधुदुर्गात प्रथमच गळा चिरून हत्याकांड घडले असल्याने पोलीसही चक्रावून गेले होते पोलिसांची वेगवेगळी पथके आपल्या परीने तपास करत होते.सुरूवातीला हे हत्याकांड जमिन जागेतून घडविण्यात आले असा संशय होता पण खानविलकर यांच्या भाच्याने जागेची कागदपत्रे पोलीसिकडे सादर करताच हे हत्याकांड चोरीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यातून पोलीस तपास करत होते.
हा तपास करतना पोलीसांना एक महत्वाचा दुवा सापडला होता यात कुशल याच्या चप्पलाचा ठसा मिळाला होता त्यामुळे पोलीसाचा संशय कुशल वर बळवला त्यानंतर तपासाची एक एक कडी उलगडत गेली पण पोलीस तपासा पासून कुशल हा पळत होता.सुरूवातीला त्याला चौकशीला बोलविण्यात आले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने विषप्राशन करून घरातून निघून गेला त्यामुळे पोलीसाचा संशय आणखी बळवला पण त्याची प्रकृती साथ देत नसल्याने त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरीच विश्रांती घेत होता.अशातच पोलीस तपास पुढे पुढे जात होता त्याची दुचाकी ही पोलीसानी ताब्यात घेतली त्यानंतर आपण आता पुरता अडकलो आहे.असे दिसताच त्याने पुन्हा घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला तो मंगळवारी 9 नोव्हेंबर ला घरातून पळून गेला सुरूवातीला पोलीसांना गुगारा देण्यासाठी आंबोली च्या जंगलात मोबाईल फेकला आणि मुंबईला गेला पण तेथून ही पत्नीला फोन केला आणि तो पोलीसाच्या चक्रव्यूह फसला सावंतवाडी पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी त्याला ठाणे येथून ताब्यात घेतले शनिवारी त्याला सावंतवाडीत आणण्यात आले आहे.
शनिवारी सावंतवाडीत आणल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी त्यांची कसून चौकशी केली या चौकशीत त्याने हत्याकांड आपणच घडवल्याची कबुली देत आपल्यावर पाच लाख रूपयांचे कर्ज होते.या कर्जाच्या लोभातूनच हे हत्याकांड केले आरोपीच्या घरातून सुरा जप्त केला आहे.पोलीसांनी आरोपीने हत्याकांडाची कबुली दिल्यानंतर त्याच्या वर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याची रितसर वैद्यकीय तपासणी केली असून अटक करण्यात आले आहे. मुलाला मिठी मारून ढसा ढसा रडलाआरोपी कुशल टगसाळी याने चोरीची कबुली दिल्यानंतर शनिवारी सायकाळी उशिरा त्याला घरी नेण्यात आले त्यावेळी घराचा पंचनामा केल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस घेऊन जात असतना घराबाहेर पत्नी लहान मुलाला घेऊन होती त्या मुलाला धरून आरोपी टगसाळी ढसाढसा रडला.