सावंतवाडी:सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला असून दोन वृद्ध महिलांची राहत्या घरात शनिवारी रात्री च्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आहे.हे हत्याकांड प्रॉपर्टी च्या वादातून घडले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अदाज असून हत्या झालेल्या मध्ये प्रॉपर्टी ची मालकीण निलिमा नारायण खानविलकर (80) व तिच्या देखरेखीत साठी असलेल्या शालिनी शांताराम सावंत (77) यांचा समावेश आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व अधिकार्याना तपासा बाबत मार्गदर्शन केले.
सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील घाडगे निवास स्थानाच्या समोर खानविलकर कुटुंब असून या घरात नीलिमा खानविलकर या वृध्द महिला एकट्याच राहत होत्या.त्याचा भाचा हा मुंबई येथे असतो त्यामुळे त्याचे मित्र राजू मसुरकर यांनी सावंतवाडीतील एक फूले विक्री करणारी महिला शालिनी सावंत यांना न्यायालयात वृध्द महिले सोबत देखरेखी साठी ठेवण्यात आले होते.
या दोघाीना जेवणाचे डबे ही बाहेरून दिले जात होते.दखरेखीसाठी असलेल्या महिलेला डबा तिचा मुलगा देत असे तर घरांची मालकीण निलिमा खानविलकर हिला डबा बाहेरून आणून दिला जात असे शनिवारी सांंयकाळी ठरल्या प्रमाणे हा डबा आणून देण्यात आला होता. देखरेखीसाठी असलेल्या महिलेला तिचा मुलांने सांयकाळी साडेसात सुमारास जेवणाचा डबा आणून दिला दोघींनी ही जेवण केले नव्हते.गॅस वर तसेच जेवण घरातील विज पुरवठा ही बंद करण्यात आला नव्हता त्यामुळे सर्व काहि सुरू होते.
दरम्यान रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी खानविलकर या वृध्द असल्याने त्याना हाक मारण्यासाठी गेले असता त्याना दोन्ही वृध्द महिला जेवण खोलीत रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या दिसल्या त्यामुळे मसूरकर हे चांगलेच चक्रावून गेले त्यांनी लागलीच पोलिसांना तसेच आजू बाजूच्या लोकांना यांची माहीती दिली त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व वस्तूस्थीती जाणून घेतली दोन्ही वृध्द महिलांना क्रुरतेने मारले असून,तीक्ष्ण हत्याराचा वापर करण्यात आला आहे.दोघाही वृध्दाचा डोक्यावर तसेच हातावर मानेवर मोठे वार करण्यात आले होते.त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांच्या मते मारेकरी हा ओळखीचा असावा त्याच्या साठी गॅसवर जेवण ही केले होते.पण तो जेवला नाही असा पोलिसांना संशय आहे.या दोन्ही वृध्दाच्या गळ्यात सोन्याच्या चेन होत्या मात्र या चेन तशाच असल्याने चारीच्या उद्देशाने हे कृत्य केले नसून ज्या घरात हत्या झाली ते घर व आजू बाजूची जागा अशी मिळून १४ गुठे जागा आहे.त्यामुळे मध्यवर्थाे ठिकाणी ही जागा असल्याने कोणाला तरी या जागेचा मोह ही आवरता आला नसवा त्यामुळे हे कृत्य केले कि काय असा सशंय पोलीस व्यकत करत आहेत.
सावंतवाडीत दुहेरी हत्याकांडाचा प्रकार प्रथमच घडला आहे. त्यामुळे हा प्रकार ओळखीतूनच झाला कि काय अशी चर्चा असून,पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील कुटीर रूग्णालयात हलविले आहेत.शालिनी सावंंत हिचा मुलगा राजू हा घटनास्थळी आला होता तर निलिमा खानविलकर हिचा भाचा हा मुंबई हून मालवण कट्टा येथे आल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे त्याला या घटनेची माहीती देउन बोलवून घेण्यात आले असून,तो ही सावंतवाडीत दाखल झाला आहे.