नाशिक : सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींची फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत असताना एका मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून एकाने गंगापूर रोडवरील दाम्पत्याला सरकारी नोकरीला आमिष दाखविले. तसेच त्यांची ८० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिसांत संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील (रा. पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगापूर रोडवरील आनंदवली थांबा परिसरात राहणारे फिर्यादी सुभाष सुरेश चेवले (३९) यांना व त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २०२२ सालापासून आतापर्यंत ३५ लाख रुपये उकळण्यात आले.
तसेच, अन्य दोघांचीही अशाचप्रकारे संशयित पाटील याने पैसे उकळून एकूण ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी पाटील यास ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वीही अशाच प्रकाचे फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.