शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

धक्कादायक! CCTV खराब, नाही वाजला अलार्म; SBI चे ATM कापून चोरांनी लंपास केले 20 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 2:28 PM

चोरट्यांनी एटीएम बुथमध्ये प्रवेश करून थेट कॅश बॉक्स पळवून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बस्ती जिल्ह्यात चोरांचा वावर वाढला आहे. येथे चोरट्यांनी एटीएम बुथमध्ये प्रवेश करून थेट कॅश बॉक्स पळवून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मशीनमध्ये 20 लाख रुपये रोख असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कप्तानगंज मार्केटमध्ये एसबीआय बँकेचे एटीएम असून त्यातील पैसे लंपास करण्यात आले आहे. 

चोरट्यांनी कॅश बॉक्स गॅस कटरच्या सहाय्याने कापून पळवून नेला. चोरट्यांनी एटीएम गॅस कटरने कापले, मात्र पोलिसांना सुगावा लागला नाही. पोलीस रात्रभर झोपून राहिल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सुमारे 20 लाख रुपये एटीएममध्ये टाकण्यात आले. त्यानंतर किती लोकांनी पैसे काढले आणि एटीएममध्ये किती रोकड होती. हे बँकेच्या तपशीलानंतरच कळेल. एटीएममधील दरोड्याबाबतही बँकेचा निष्काळजीपणा दिसून आला.

एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा आठवड्याभरापासून खराब आहे. चोरीच्या वेळी अलार्म देखील वाजला नाही. एटीएमजवळील घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे, मात्र चोरट्यांनी त्याच्या लेन्सवर काळ्या रंगाचा फवारा मारला. पोलिसांना सापडलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघांनी चोरीची घटना घडवली आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे कप्तानगंज शहरात चोरट्यांनी रात्रभर गॅस कटरने एटीएम कापले आणि कोणालाही ते समजलं देखील नाही. 

सकाळी लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी एटीएमचे सर्व डिस्प्ले मॉनिटर सोबत नेले होते. कप्तानगंज शहरातील अंडरपासजवळ एसबीआयचे एटीएम आहे. सकाळी सातच्या सुमारास एटीएमच्या केबिनमधून धूर निघत असल्याचे तेथून जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आले. कुणीतरी पोलिसांना कळवले. कप्तानगंज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शटर उघडले. तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :SBIएसबीआयatmएटीएमCrime Newsगुन्हेगारी