पन्ना : मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यामध्ये एसबीआयचे एटीएमच डायनामाईटने उडवून देण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या एटीएममध्ये 23 लाख रुपये होते. हे सारे पैसे घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. सिमरिया पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली आहे.
पन्नामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे या घटनेवरून दिसून येत आहे. एटीएमबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून बांधून ठेवले. यानंतर एटीएम मशीन डायनामाईटने उडवून दिली. दरोडेखोरांनी या एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये दिसू नये म्हणून कॅमेऱ्य़ावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला होता. एटीएमच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, दोन तोंड झाकलेले दरोडेखोर आले होते. त्यांनी बंदूक दाखवून मला बांधले. त्यानंतर मशीन स्फोटकांनी उडविली.
धक्कादायक बाब म्हणजे एटीएम सेंटरपासून 200 मीटरच्या अंतरावर सिमरिया पोलीस ठाणे आहे. यामुळे अशी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरोडेखोरांनी पोलीस ठाणे जवळ असताना एटीएम लुटले. जे काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे त्याच्या आधारेच पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच सुरक्षा रक्षकाचीही चौकशी सुरु आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?
बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर
चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच