माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा जणू परवलीचा शब्द बनला आहे. अशातच एआय व्हाॅइस स्कॅम हा फसवणुकीचा नवा प्रकार एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. देशातील सुमारे निम्म्या प्रौढांनी एआय व्हॉइस स्कॅमचा फटका खाल्ला आहे किंवा त्यांच्या जवळच्या कुणाचीतरी या मार्गाने फसवणूक झालेली आहे.
फसवणुकीचा हा प्रकार सर्वत्र फोफावत असला तरी भारतात यामुळे पीडित असलेल्यांचे प्रमाण जगभरातील एकूण पीडितांच्या तब्बल दुप्पट आहे. यामुळे एआयपासून लोकांना अधिक सावधानता बाळगावी लागणार आहे.
बहुतांश यूझर्स बेसावध६९% लोकांना आजच्या घडीला त्यांचा खरा आवाज आणि एआय आवाज यात काही फरक असतो हेच ठाऊक नाही. ते या दोन्ही आवाजातील फरक ओळखू शकत नाहीत. ६६% लोक एखादा मित्र वा जवळच्या व्यक्तीकडून व्हॉइस मेसेज वा व्हाॅइस नोट आली तरी उत्तर देण्यास तयार झाले. समोरच्या व्यक्तीने संकटाचे कारण सांगितल्याने त्यांना याचा संशय आला नाही. या लोकांनी प्रसंगी पैसे पाठवण्याचीही तयारी दाखविली.
केवळ ३ सेकंदांचा आवाज पुरेसा ऑनलाइन फसवणूक करताना एआयचा वापर कसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, याबाबत मॅकेफी या संस्थेने सर्वेक्षण केले. हा मुद्दा खूप गंभीर असल्याचे लक्षात आले. कारण एखाद्या व्यक्तीच्या आवाजाप्रमाणे हुबेहूब आवाज तयार करावयाचा असेल ३ सेकंदांचा आवाज पुरेसा होतो. या डुप्लीकेट आवाजाच्या मदतीने संबंधित व्यक्तीला गंडा घातला जाऊ शकतो.
कोणती कारणे सांगितली?७०% मेसेज लुबाडणुकीचे कारण६९% प्रकरणांत कारला अपघाताचे कारण ६५% पाकीट मारले किंवा हरवले ६२% परदेशी प्रवासात मदतीसाठी