Sealdah Rajdhani Express firing: सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही भयावह घटना गुरुवार घडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर त्या व्यक्तीला ट्रेनमधून उतरवून अटक करण्यात आल्याचेही स्पष्ट केले गेले आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराच्या वेळी ती व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती का?, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
ही घटना एका वकिलाने त्याच्या डोळ्यासमोर घडल्याचे सांगितले. स्वतःच्या डोळ्यांनी ही घटना पाहताना त्यांनाही धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले. घटनेच्या वेळी सियालदह राजधानी एक्स्प्रेसमधील एका वकिलाने सांगितले की, अचानक घडलेल्या या घटनेनंतर प्रवासी बराच वेळ घाबरले होते. संपूर्ण ट्रेनचा कसून शोध घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याने बराच काळ वातावरण तणावपूर्ण होते.
जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्येही घटना होती गोळीबाराची घटना
असाच एक प्रकार जुलै महिन्यातही समोर आला होता. पालघर स्थानकाजवळ जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. 31 जुलै रोजी, माजी रेल्वे सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीना आणि ट्रेनमध्ये प्रवास करणार्या इतर तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार घडला होता.
खून व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला
या घटनेतील गोळीबार करणारा चौधरी याला गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रासह अटक करण्यात आली असून त्याच्यावर खून व अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याशिवाय धर्माच्या आधारे गटांमध्ये शत्रुत्व भडकवण्याचे कलमही चौधरीवर लावण्यात आले होते.