ठाणे : लॉकडाऊनमुळे एका चांगल्या खासगी कंपनीतील नोकरी गेली. त्यातच मोठ्या आजारपणाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या देवेंद्र दत्ताराम कदम (४०, रा. महात्मा फुलेनगर, ठाणे) या सुरक्षारक्षकाने रविवारी सकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देवेंद्र याची एका चांगल्या कंपनीतील नोकरी अलीकडेच गेली. त्यानंतर त्याने खासगी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी पत्करली होती. परंतु, त्याला मोठ्या आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यातच त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याची माहिती त्याला रुग्णालयातून समजली होती. त्यामुळे तणावग्रस्त झाल्याने त्याने ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजण्याच्या सुमारास घरातच कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पत्नी घरकामासाठी गेली हाेती घराबाहेरआरोनीने आत्महत्या केली त्यावेळी त्याची पत्नी दीक्षा (३८) ही घरकामासाठी तर आठ वर्षीय मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव हे अधिक तपास करीत आहेत.