नोएडा – पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर(Seema Haider)वर यूपी एटीएसचा संशय बळावत चालला आहे. एटीएस सातत्याने सीमा हैदरकडून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सचिन आणि सीमा यांची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानच्या सिंध परिसरात सीमा राहते. तिथून ती कराचीहून युएईच्या शारजाहला गेली. तिथून नेपाळमार्गे भारतात अवैधरित्या प्रवेश केला.
नोएडाच्या सेक्टर ५८च्या एटीएस ऑफिसमध्ये सीमा आणि सचिन यांची चौकशी सुरू आहे. सीमा हैदरची एटीएसनं ८ तास चौकशी केली. सीमा हैदर तपास यंत्रणांची दिशाभूल करत असल्याचा संशय ATS अधिकाऱ्यांना आहे. ज्यारितीने सीमा प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तरे देतेय त्याने एटीएसची शंका आणखी बळावत चालली आहे. सीमा हैदरला कुणी गाईड करतंय का असा संशय अधिकाऱ्यांना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपी एटीएसला IB कडून काही इनपुट्स मिळाले आहेत. त्यामुळे सीमासोबतच सचिन आणि त्याच्या वडिलांचीही चौकशी होत आहे. सीमाला ISI ने तर पाठवले नाही ना..१५ दिवस लपून राहिल्यानंतर जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा सीमेपलीकडून त्याला लव्हस्टोरीचा बनावट स्टोरी बनवून दिशाभूल करण्याचा तर डाव नाही ना असंही तपास अधिकाऱ्यांना वाटते.
सीमा हैदरचे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी यूपी एटीएस या १५ प्रश्नांची उत्तरे शोधतंय.
- सीमा-सचिन पहिल्यांदा कधी आणि कसे भेटले?
- खरेच दोघे PUBG गेमवरच पहिल्यांदा भेटले होते का?
- सचिनला भेटण्यापूर्वी सीमाच्या आयुष्याचे सत्य काय होते?
- सीमाची सोशल मीडियावरील खाती कुठे आहेत, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय आहे?
- सचिनला पहिल्यांदा भेटून भारतात येईपर्यंत सीमाने कोणते मोबाईल नंबर वापरले होते?
- सीमाने पाकिस्तानातील घर विकल्याचा पुरावा काय?
- सीमा आणि तिचा पहिला पती गुलाम हैदर यांचे नाते आणि चार मुलांचे सत्य काय आहे?
- पाकिस्तानमध्ये असताना सीमा कोणत्याही पाक एजन्सीच्या संपर्कात होती का?
- सीमाने तिच्या मोबाईलमधून काही डेटा डिलीट केला का?
- सीमा हैदरच्या बालपणापासून ते भारतात येईपर्यंतचे संपूर्ण सत्य काय आहे?
- कराची ते शारजाह आणि शारजाह ते काठमांडू या प्रवासात सीमाला कुणी मदत केली?
- काठमांडूमध्ये सचिनसोबत सीमा कोणत्या हॉटेलमध्ये राहिली, कोणत्या मंदिरात आणि तिचे लग्न कधी झाले?
- सचिनच्या आधीही सीमाचे PUBG किंवा इतर गेमिंग अॅप्सवर कोणी मित्र होते का?
- सचिनला भेटल्यावर सीमाने हिंदी सुधारली की आधीच?
- सचिन व्यतिरिक्त सीमाचे भारतात आणखी कोणी मित्र आहेत का?