शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 8:44 PM

आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.

ठळक मुद्दे हस्तगत केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ३ कोटी आहे. संशयित आलेक्स सध्या हा पोलीस कोठडीत आहे.पोलिसांनी थरारक पाठलाग करून 3 नायजेरियन नागरिकांना १.५४ लाखाच्या अमली पदार्थांच्या मुद्देमालसह अटक केली.

म्हापसा - कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे छापा मारून नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ आलेक्स याला अटक करून सुमारे ३ कोटीचे अमली पदार्थ जप्त केले. यात कोकेन, एमडीएमए, अँफेटॅमिन, चरस, गांजा व २ लाख रुपये रोख सापडले आहेत. आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.कळंगुट पोलिसांच्या माहितीनुसार, दि. २९ रोजी सीमेर-कांदोळी येथे संशयित राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत छापा मारला. यावेळी पोलिसांनी नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ आलेक्स (३४) याला अटक  करून त्याच्याकडून १.०२१ किलो कोकेन, २.०३५ किलो एमडीएमए, ७६० ग्रॅम अँफेटॅमिन,  १०६ ग्रॅम चरस, १.२७० किलो गांजा व रोख २ लाख सापडले. हस्तगत केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ३ कोटी आहे. संशयित आलेक्स सध्या हा पोलीस कोठडीत आहे.यापूर्वी २०११ साली संशयिताला राज्यात अवैद्यरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच २०१२ मध्ये कळंगुट पोलिसांनी कोकेनप्रकरणात अटक केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, महिला उपनिरीक्षक प्रगती मलीक, पोलीस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, शंशाक साखळकर, महाबळेश्वर सावंत, सुरेश नाईक, स्मीतल बांदेकर, संज्योत केरकर, गोविंद फटनिक, राजेश पार्सेकर, मनोज नाईक, महेंद्र च्यारी, बाबुसो साळगावकर, योगेश खोलकर, लक्ष्मण मांद्रेकर, दिनेश मोरजकर, शैलेश गडेकर यांनी यात भाग घेतला. एनडीपीसी २१ (सी), २२ (सी), २० (बी) (), २० (बी)(ए) याच्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक उत्किृष्ट प्रसून, पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलीस करीत आहेत.दरम्यान, शनिवारी (दि.१९) मध्यरात्री कळंगुट व साळगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून 3 नायजेरियन नागरिकांना १.५४ लाखाच्या अमली पदार्थांच्या मुद्देमालसह अटक केली. सुमारे १२ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी संशयितांना साळगाव येथे अटक केली. यात दोघे पोलीस किरकोळ जखमी झाले. यामध्ये किनारी पट्ट्यातील कुख्यात ड्रग डिलर मायकल ओकाफोर याला अटक केली होती. 

टॅग्स :ArrestअटकgoaगोवाPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ