कानपूर : पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलीसच ग्राहक बनून गेल्याने हे ऑनलाईन रॅकेट उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे रॅकेट चालविणारा स्वत:च्या पत्नीलादेखील ग्राहकांकडे पाठवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कानपूर पोलिसांनी रॅकेटचा मुखिया, त्याची सासू आणि एका तरुणीला अटक केली आहे.
पोलिसांना ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरु असल्याचा माहिती मिळाली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या एका हवालदाराने व्हॉट्सअॅपवरून ग्राहक बनून कॉल केला होता. यानंतर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या व्यक्तीने काही मुलींचे फोटो त्या पोलिसाला पाठवून दिले. पोलिसांनी यानंतर सापळा रचत मुख्य आरोपी आणि दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी काही आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. चौकशीमध्ये मुख्य आरोपी त्याच्या पत्नीलाही ग्राहकांकडे पाठवत होता. सध्या त्याची पत्नी फरार झाली आहे.
चकेरी ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. शिवकरटरा रो़डवर हा सेक्स रॅकेट कार्यरत होते. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी सक्रीय होती. मुख्य आरोपी दीपक सिंह हा कोलकाताचा आहे. त्याने आंतरजातीय विवाह केला होता. तो त्याची पत्नी आणि सासूसोबत कानपूरमध्ये राहत होता. सेक्स रॅकेटसाठी दीपक पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथून मुलींना बोलवत होता.
य़ा सेक्स रॅकेटची तक्रार अंशू सिंह नावाच्या एका व्यक्तीने कानपूर पोलिसांच्या ट्विटरवर केली होती. यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी या ट्विटवर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यानंतर चकेरी पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी जाळे टाकले होते.
कॉलगर्ललाही पकडलेपोलिसांनी दीपक सिंहच्या फ्लॅटवरून एका कॉलगर्ललही पकडले आहे. ही तरुणी कोलकाता येथील राहणारी आहे. चौकशीत तिने पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील मुलींना 15 दिवस किंवा एका आठवड्यासाठी कमीशनवर बोलविण्यात येत असल्याचे सांगितले. या मुलींना दीपक ग्राहक सांगतील त्या पत्त्यावर पाठवत होता. यासाठी वेगळा चार्ज घेतला जात होता. जर ग्राहक त्यांच्याकडे गेला तर वेगळे पैसे आकारले जात होते.
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले