IPS Sanjay Panday : वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे राज्य सरकारविरोधात घेणार हायकोर्टात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:59 PM2021-03-23T15:59:13+5:302021-03-23T16:00:04+5:30

IPS Sanjay Panday : ज्येष्ठता डावल्याने आता संजय पांडे राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समोर आले आहे.

Senior IPS officer Sanjay Pandey will run in high court against the state government | IPS Sanjay Panday : वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे राज्य सरकारविरोधात घेणार हायकोर्टात धाव 

IPS Sanjay Panday : वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे राज्य सरकारविरोधात घेणार हायकोर्टात धाव 

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली. या बदलीनंतर संजय पांडे यांच्या तुलनेने त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला महासंचालक नेमण्यात आले.

सध्या चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आता महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये बदली केलेलया वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे देखील मुंबईउच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. 

सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस दलात काही फेरबदल करून काही आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली. १९८६ च्या बॅचचे म्हणजेच सर्वात वरिष्ठ असूनही पोलीस महासंचालकपदी नियुक्ती न केल्याने संजय पांडे यांनी राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठता डावल्याने आता संजय पांडे राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समोर आले आहे.

संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी उचलबांगडी केल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद रिक्त झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी असलेले हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी नियुक्त करण्यात आले आणि महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती केली. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली. या बदलीनंतर संजय पांडे यांच्या तुलनेने त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला महासंचालक नेमण्यात आले. रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. यामुळे संजय पांडे नाराज झाले असून आपल्यावर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी आता संजय पांडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

Web Title: Senior IPS officer Sanjay Pandey will run in high court against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.