पुणे : ज्येष्ठ नागरिकाला अटक न करण्यासाठी ७० लाख रुपये घेऊन जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने शहर पोलीस दलात एकचखळबळ उडाली आहे. रौफ शेख (वय ५५) असे अटक केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणीखडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रौफ शेख यांनी सुमारे १ कोटी ६२ लाख रुपयांचा हा फ्लॅट आपल्या बहिणीच्या नावावर केला आहे. या प्रकरणी रवी अय्यास्वामी रामसुब्रह्मण्यन यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी शेख यांना अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रवी अय्यास्वामी यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली नव्हती. या गुन्ह्याचा तपास सायबर व आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस निरीक्षक रौफ शेख यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी या तक्रारदाराला अटक न करण्यासाठी त्यांच्याकडून ७० लाख रुपये आणि खडकी परिसरातील दीड कोटी रुपयांचा फ्लॅट मागितला. त्यांनी तक्रारदाराकडून ७० लाख रुपये घेतले तसेच फ्लॅटचा ताबादेखील घेतला. मात्र, त्यानंतरही या तक्रारदाराला रौफ शेख यांनी अटक केली. त्यांना त्यात न्यायालयीन कोठडी मिळाली. दरम्यान, रौफ शेख यांचीआर्थिक गुन्हे शाखेतून विशेष शाखेत बदली करण्यात आली. दोन महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाल्यावर तक्रारदार यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन त्यांना अर्ज करून ही सर्व हकीकत सांगितली. पोलीस आयुक्तांनी रौफ शेख यांच्या चौकशीचे आदेश सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे सोपविली. तक्रारदारांच्या अर्जाची गेल्या ४ महिन्यांपासून चौकशी सुरू होती. या चौकशीत रौफ शेख यांनी ७० लाख रुपये आणि फ्लॅट घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रौफ शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार
नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल
अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी