तेजपूर: आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यात एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या सात विद्यार्थ्यांना रविवारी पोलिसांनी अटक केली. या विद्यार्थ्यांनी नुकतीच १०वीची बोर्डाची परीक्षा दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलांनी मुलीला झाडाला लटकवून गळफास लावला आणि हत्या केली. ही घटना शुक्रवारी चाकला गावात घडली आहे. गोहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकला गावात शुक्रवारी १२ वर्षीय मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि जंगलात नेऊन झाडावर लटकावून गळफास लावला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. रविवारी पोलिसांच्या पथकाने या सर्व सात दहावीच्या परीक्षार्थींना पकडले.