विस्तार - उत्तराखंडमध्ये रुडकीमध्ये ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे स्वतःसोबत काढलेले फोटो फेसबुकवर टाकले. याबाबत गर्लफ्रेंडला कळल्यानंतर तिने या गोष्टीस विरोध केला. बॉयफ्रेंड मित्रांच्या मोबाईलवरून फोन करून पीडित गर्लफ्रेंडला धमकी देत असल्याचा देखील आरोप केला आहे.
तिच्या नावाचे बोगस ईमेल आयडी बनवून मेसेज देखील पाठवत आहे. याप्रकरणी पीडित मुलीने एसपी देहात यांच्याकडे तक्रार केली आहे. एसपी देहात यांनी तपासासाठी निर्देश दिले आहेत. मंगलौर कोतवाली परिसरात राहणाऱ्या या तरुणीची एका वर्षापूर्वी रुड़कीमध्ये एका मुलाशी ओळख झाली होती.
मुुलाने मुलीला इंजीनियर असल्याचे सांगितले. नंंतर दोघांची ओळख मैत्रीत बदलली दोघेही एक-दुसर्याचे मोबाईल नंबर देखील दिले. नंतर फोनवर एकमेकांशी बोलू लागले. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघे भेटू लागले. विश्वासाने मुलीने आपल्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड बॉयफ्रेंडला दिला होता. दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढले. दरम्यान, कोणत्यातरी गोष्टीवरून दोघांत वादंग निर्माण झाला आणि ब्रेकअप झालं. त्यानंतर दोघांनी बोलणं बंद केलं. याचा बदला घेण्यासाठी मुलाने म्हणजेच बॉयफ्रेंडने तिच्यासोबत काढलेले फोटो तिच्या फेसबुकवर अपलोड केले. त्याचबरोबर तो मित्रांच्या मोबाईलवरून कॉल करून धमकी देत होता. इतकेच नाही तर त्या युवतीच्या नावाचे बोगस ई-मेल आयडी देखील बनवले आणि त्याद्वारे मॅसेज करून धमकी देऊ लागला.
पीडित तरुणीने एसपी देहात एस.के. सिंह यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. एसपी देहातने प्रकरणात तपासणी करून कारवाईचे आश्वासन तिला दिली आहे.