मुंबई - लग्न करतो म्हणून सांगून हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप मुंबईतील एका तरुणीने फुटबॉलपटूवर केला आहे. हा फुटबॉलपटू पंजाबचा आहे. या दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली होती. या प्रकरणी तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस तपास करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरूणीची आणि फुटबॉलपटूची ओळख झाली होती. पंजाबचा फुटबॉलपटू मुंबईत आला होता. त्यानंतर ती काम करत असलेल्या हेल्थ क्लबमध्ये येऊन तिला भेटला. गुडघ्याला दुखापत झाली असून त्याच्यावरील उपचारासाठी मुंबईत आल्याचे त्याने तिला सांगितलं होतं. तसेच दोघांच्याही कुटुंबीयांनी एकमेकांची भेट घेऊन लग्न ठरवले होते. दरम्यान, या फुटबॉलपटू मुलीला गोरेगावमधील एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे तिला बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप तरुणीने पोलीस तक्रारीत केला आहे. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी जे जे मार्ग येथील तिच्या घरी गेला. तेथेही त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप तिने केला आहे.शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आणि मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने पोलीस ठाण्याची पायरी चढली. तिने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले असून, बदनामी करण्याची धमकी दिली असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीबद्दल अधिक माहिती दिली नाही. आरोपी नेमका कोण आहे, तो फुटबॉलपटू आहे का, याची खात्री पोलिसांकडून केली जात आहे. त्यानंतर त्याला मुंबईत चौकशीसाठी आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक
Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी