पश्चिम बंगाल - भाजपाचे बराकपूरचे खासदार अर्जुन सिंग यांच्यावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. खासदार अर्जुन सिंग यांनी सांगितले की, माझ्यावर हल्ला करण्यात आली आणि माझी कारची तोडफोड करण्यात आली. सर्वजण शांततेत आंदोलन करत होते. पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी लाठीचार्ज करत माझ्या डोक्यावर प्रहार केला. तसेच मला शिवीगाळ केली. माझ्या घरावर देखील हल्ला करण्यात आला.
खासदार अर्जुन सिंग यांच्या कारवर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ला करत गाडीचे नुकसान केले. ही घटना आज घडली असून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या समर्थकांमध्ये वादातून ही घटना घडली आहे. जेव्हा भाजपाच्या समर्थकांनी या वादाला विरोध करत आंदोलन केले त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान, खासदार अर्जुन सिंग हे लाठीचार्जमध्ये जखमी झाले असल्याचा दावा भाजपाने केला आहे.