शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

खळबळजनक! कर्फ्यूतही दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 3:40 PM

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.

ठळक मुद्देधर्मेंद्र सोनकर असे काँग्रेस नेत्याचे नाव आहे. लॉकडाऊन आणि कर्फ्यू असूनही हत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ल्याचा आरोपी मोनू सोनकर हा असून त्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.

जबलपूर - मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये गुरुवारी घराबाहेर एका काँग्रेस नेता आणि माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

हत्येच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.

 

मात्र, हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. हत्येचे कारण परस्पर शत्रुत्व असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी कर्फ्यूदरम्यान पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असतानाही काँग्रेस नेत्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे परिसरात दहशत पसरली होती. जुन्या शत्रूत्वामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी प्रभाग नगरसेवक यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

हनुमानतालस्थित भानतलैया भागात दुपारी गोळीबार झाल्याने घबराट पसरली. या भागातील राधाकृष्ण मालवीय प्रभागातील माजी नगरसेवक धर्मेंद्र सोनकर हे घराच्या बाहेर मंदिरात बसले होते. दरम्यान, हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. गुन्हा करून हल्लेखोर पळून गेले. जवळच्या लोकांनी धर्मेंद्र सोनकर यांना गंभीर अवस्थेत शहर रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.धर्मेंद्रच्या छाती आणि पोटात गोळ्या लागल्याहल्ल्यादरम्यान धर्मेंद्र सोनकर यांच्या छातीवर आणि कमरेला गोळी लागली होती. गोळी लागताच सोनकर जमिनीवर कोसळले. गोळीचा आवाज ऐकताच कुटुंबीय घराबाहेर घटनास्थळी पोचले, तेव्हा धर्मेंद्र रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेले होते. नातेवाईक आणि आसपासच्या लोकांच्या मदतीने त्याला तातडीने सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेबाबत पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे की, हल्ल्याचा आरोपी मोनू सोनकर हा असून त्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. धर्मेंद्र यांना ठार मारल्यानंतर आरोपीने स्व:त पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्याने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि सांगितले की धर्मेंद्र यांची हत्या करून तो आला आहे.

 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटकDeathमृत्यूcongressकाँग्रेस