ठळक मुद्दे मंगळुरु विमानतळाच्या तिकीट काउंटरजवळ आयईडीसारखे स्फोटकं असलेली बॅग सापडली आहे. बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला
कर्नाटक - मंगळुरु विमानतळाच्या तिकिट काउंटरजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली असून खळबळ माजली आहे. सीआयएसएफचे डीआयजी अनिल पांडे यांनी यांनी मंगळुरु विमानतळाच्या तिकीट काउंटरजवळ आयईडीसारखे स्फोटकं असलेली बॅग सापडली आहे. आम्ही विमानतळ परिसर सुरक्षितपणे खाली केला आहे अशी माहिती दिली.
बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला असल्याची माहिती मंगळुरुचे पोलीस आयुक्त डॉ. पी. एस. हर्षा यांनी सांगितली. संशयास्पद बॅग विमानतळ परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती.