मुंबई - सांताक्रूझ पूर्वेकडील पटेल नगर येथील सहयुवक सहजीवन प्रगती मंडळ येथे आज माय - लेकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. आज मुंबईसह अनेक शहरात मुसळधार पावसाने झोडपले असून दरम्यान अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या आहेत. सांताक्रूझ येथील गोळीबार कॉलनीत देखील माला नागम (५०) आणि संकेत नागम (२६) या माय - लेकराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नागम यांच्या राहत्या घरासमोरील माला या शिडीला शॉक लागून चिकटल्या असता त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा संकेत हा गेला असता ते दोघेही शिडीला शॉक लागून चिकटला. त्यांनतर दोघांना पोलिसांनी औषधोपचारासाठी व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून दाखलपूर्व दोघांना मयत घोषित केले. त्यांनतर परिसरात खळबळ माजली होती असून स्थानिक संतप्त झाले होते.