शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

खळबळजनक! युवकाची चाकूने भोसकून केली हत्या; फेकून दिला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 7:57 PM

जांब रोडवर; ओळख पटली नाही 

ठळक मुद्देगुरुवारी सायंकाळी ६ वाजता परिसरातील व्यक्तीला हा मृतदेह आढळून आला.हा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

यवतमाळ : येथील जांब रोडवर वन उद्यानाच्या संरक्षण भिंतीलगत ३० ते ३२ वयोगटातील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूचे घाव केल्याचे स्पष्टपणे दिसत होते. यावरून हा खूनच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या युवकाची ओळख पटविण्याचे काम अवधूतवाडी पोलीस करीत आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता परिसरातील व्यक्तीला हा मृतदेह आढळून आला.

जांब रोडवर वन उद्यानाच्या संरक्षण भिंतीलगत बेवारस मृतदेह पडून असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले. त्या युवकाचा खून करताना मारेकऱ्यांनी चाकूचे वार केल्यानंतर दगडाने पूर्ण चेहरा ठेचून काढला. त्यामुळे ओळख पटविणे आणखीच कठीण झाले आहे. रस्त्यापासून काही अंतरावर हा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंगावरील कपडे व वयाच्या वर्णनावरून बेपत्ता युवकांचे मिळते जुळते वर्णन यावरून शोध  घेतला जात आहे. हा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :MurderखूनYavatmalयवतमाळPoliceपोलिस