शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाठवला सासूला; लालची पतीने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने केले दुष्कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 6:48 PM

Dowry Case : पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आहे. 

ठळक मुद्देलग्नानंतर नवरा तिला गुजरातला घेऊन गेला. तिथे नवऱ्याने तिच्यावर अनैतिक दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. प्रतिकार केल्यावर पीडित तरुणीला मारहाण करण्यात आली आणि तिला समुद्रात फेकण्याची धमकी देण्यात आली.

 

हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नवऱ्याने आपल्या सासूच्या मोबाइलवर पत्नीचा अश्लिल व्हिडिओ पाठविला पीडितेने कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा  दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आहे. लग्नाच्या वेळी पीडितेच्या आईने बऱ्याच वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. सिडकुल पोलिस ठाण्याचे प्रभारी लखपतसिंग बुटोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने फेब्रुवारी २०२१ रोजी मुरादाबादच्या पकबरा भागात राहणाऱ्या रिझवान याच्याशी झाला होता असल्याचे सांगितले. विवाहित महिलेने सांगितले की, लग्नाच्या वेळी तिच्या आईने भेट म्हणून पुष्कळ सामान दिले होते.आक्षेप घेतल्यानंतर पीडितेला मारहाण केली गेलीलग्नानंतर नवरा तिला गुजरातला घेऊन गेला. तिथे नवऱ्याने तिच्यावर अनैतिक दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. प्रतिकार केल्यावर पीडित तरुणीला मारहाण करण्यात आली आणि तिला समुद्रात फेकण्याची धमकी देण्यात आली.विवाहितेचा आरोप - यापूर्वी पतीने लग्न केले होतेअसा आरोप केला जात आहे की, गुजरातहून परत आल्यावर तिची मेहुणी अरमाना, मेहुणा उस्मान आणि पती रिजवान यांनी तिच्यावर अनेक वेळा प्राणघातक हल्ला केला. विवाहित महिलेचा आरोप आहे की, पतीने यापूर्वी लग्न केले आहे. पहिली पत्नी दिल्लीत राहते. विवाहित महिला सासरच्यांनी वैतागली आणि हरिद्वार येथील आपल्या माहेरी आली. त्यानंतर तिच्या नवऱ्याने एक लाख रुपयांची मागणी केली.पोलिसांनी तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून न्यायालयात जावे लागलेपैसे न मिळाल्याने पतीने तिच्या आईच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाठवले आणि त्यांना व्हायरल करण्याची धमकीही दिली. पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तेव्हा त्यांना न्यायालयात जावे लागले. पोलिस स्टेशनचे प्रभारी लखपतसिंग बुटोला यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानुसार पती रिजवान, मेहुणे उस्मान आणि मेव्हणी अरमानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.

विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याने सासू आणि पतीवर हुंडाबळीचा गुन्हा अल्मोडा येथे आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणात तिच्या सासू आणि तिच्या पतीच्या विरोधात लामगडा पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.लमगाडा ब्लॉकच्या माल्टा गाव येथील केशव राम यांची पत्नी गायत्री देवी (वय 24) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. नातेवाईकांनी सांगितले की, केशवला गायत्रीचा मृतदेह गळफास घेतलेलय अवस्थेत आढळला. 108 च्या मदतीने तिला महिला हॉस्पिटल अल्मोडा येथे आणण्यात आले. जेथे डॉक्टरांनी गायत्रीला मृत घोषित केले.  

येथे सोमवारी गायत्रीची सासू माल्टा निवासी सल्ली देवी (वय 52) आणि पती केशव राम यांच्याविरूद्ध लामगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लामगाडाचे एसएचओ सुनीलसिंग बिष्ट यांनी सांगितले की, मृताचे मामा बागेश्वर येथील रहिवासी महेश रामच्या तक्रारीवरून या दोघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :dowryहुंडाPoliceपोलिसDeathमृत्यू