नालासोपारा : वसई तालुक्यात घरफोड्या व चोरी करणाऱ्यांनी उच्छाद केल्यामुळे गुन्ह्यामध्ये झपाट्याने वाढ होत होती. पालघर पोलीस अधिक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभाºयाना व अधिकाºयांना रात्रीच्या वेळेस गस्त, नाकाबंदी करण्याचे आदेश दिलेले आहे. वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहितीच्या आधारे गरफोड्या करणार्या सराईत सात गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ५ गुन्ह्यांची उकल करून सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.माहिती मिळाल्यानंतर वालीव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार मनोज मोरे, सचिन दोरकर, अनिल सोनावणे, महेश जाधव, राजेंद्र फड, बालाजी गायकवाड, सागर जैनक, सचिन बळीद आणि व्हसकोटी या टीमने सापळा रचून घरफोड्या व चोºया करणाºया सात आरोपींना अटक केली आहे. यांच्याकडून २ मोटार सायकली, ७ मोबाइल, कॉपर वायर आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ११ हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
घरफोड्या व चोरी करणारे सात आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 1:55 AM