शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘सीआययू’ अधिकाऱ्यांसह सात जणांची चौकशी, एनआयएकडून तिसऱ्या दिवशीही झाडाझडती 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 2:31 AM

गाडी पार्क करणे, इनोव्हाची नंबर प्लेट बदलणे, ठाण्यातील वाझे यांचे निवासस्थान व नंबरप्लेट बनविलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, याबद्दल त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत आहे.

मुंबई : स्फाेटक कारप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण सात पोलिसांची  राष्ट्रीय तपास यंत्रणेने  (एनआयए) मंगळवारी चौकशी केली. गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे सहायक निरीक्षक रियाझ काझी  व प्रशांत होवाळे आणि अन्य तिघांवर  अधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू ठेवला आहे. त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. साेबतच विक्रोळी पोलीस ठाण्यातील दोन पाेलीस अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत चाैकशी सुरू होती.

गाडी पार्क करणे, इनोव्हाची नंबर प्लेट बदलणे, ठाण्यातील वाझे यांचे निवासस्थान व नंबरप्लेट बनविलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, याबद्दल त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १२ फेब्रुवारीला स्काॅर्पिओ हरवल्याची तक्रार दाखल केलेल्या विक्रोळी पोलीस ठाण्यातील ड्यूटी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बाेलावण्यात आले होते. गाडीची कागदपत्रे न तपासता  तक्रार कशी घेतली, त्यासाठी  वाझे यांनी दबाव टाकला होता का, की अन्य कोणा अधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या, याबाबत त्यांचे जबाब घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ वाहन चालकांची ओळख पटली- अंबानींच्या निवासस्थानी कार ठेवणे, तसेच त्यांच्यासाेबत इनोव्हा घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचा तपास पथकाने शोध घेतला. - ते ‘सीआययू’मधील दोघे कॉन्स्टेबल असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याकडे लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसMukesh Ambaniमुकेश अंबानी