अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यात पोलिसांनी ३२ वर्षीय महिलेवर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच तिच्या पतीने आत्महत्या केली. लग्नानंतर २२ महिन्याच्या कालावधीत पत्नीने त्याला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू दिले नाही, अशी पतीची तक्रार होती. जयंती वकील चाळ येथील रहिवासी गीता परमार हिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या महिलेविरोधात मृत पती सुरेंद्रसिंग यांची आई मुली परमार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑक्टोबर 2018 मध्ये झालं होतं लग्न
आईने शहरकोटदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिचा मुलगा सुरेंद्र सिंह हा रेल्वे कर्मचारी होता. २०१६ मध्ये मुलाचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरेंद्र सिंह याने गीताशी लग्न केले. यापूर्वी गीतानेही आपल्या दोन नवऱ्यांना सोडले होते.
पत्नीने पतीबरोबर न झोपण्याची घेतली होती शपथ
एकदा मी माझ्या मुलाच्या खोलीत गेली तेव्हा मला दिसले की माझा मुलगा आणि सून वेगवेगळ्या बेडवर झोपलेले आहेत. मी विचारले असता माझ्या मुलाने सांगितले की, त्याने अद्याप पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू शकला नाही कारण पत्नीने वचन दिले होते की, ती आपल्या पतीसोबत कधीही झोपणार नाही असं सुरेंद्र सिंह यांच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे.
पतीने नैराश्यात होता
पती-पत्नी यांच्यात कोणतेही शारिरीक संबंध नसल्यानेच त्यांचा मुलगा मानसिक ताणतणावात राहिला असा आरोप आईने केला आहे. याच कारणावरुन अनेकदा माझ्या मुलामध्ये आणि सूनेत भांडण सुरू झाले. यानंतर सून तिच्या माहेरी गेली. मुलानेही तिचा फोनही ब्लॉक केला पण त्यानंतर तो नैराश्यात गेला. गेल्या २७ जुलै रोजी जेव्हा कुटुंबीय एका अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले होते तेव्हा सुरेंद्र सिंहने घरातच गळफास लावून आत्महत्या केली असं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.