पालघर - व्हॉट्सअॅपच्या मदतीने चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पैशाच्या अमिषापोटी वेश्या व्यवसाय करणाऱ्या ४ विवाहित महिलांची सुटका केली आहे. तर एजंट महिलेला पोलिसांनीअटक केली आहे. तिच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात पिटाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एजंट महिलेने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून ती विवाहित आणि अविवाहित महिलांचे विविध प्रकारचे फोटो गिऱ्हाईकांना पाठवते आणि त्याद्वारे त्यांना आकर्षित करते, अशी माहिती पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि सहायक उप पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिवदे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस मित्राच्या मदतीने बोगस गिऱ्हाईक नालासोपारा येथे पाठवला आणि सापळा रचला. त्यानंतर महिलांचे दीड हजार व एजंट महिलेचे एक हजार अशी रक्कम ठरविण्यात आली.
एजंट महिलेचे एक हजार अशी रक्कम व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ठरविण्यात आली. एजंट महिला वेळोवेळी आपले ठिकाण बदलत होती. परंतु, शेवटी नालासोपारा येथील मुख्य रस्त्यावरील रॉयल हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात भेटल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून महिलांची सुटका केली. तर एजंट महिलेला अटक केली. या महिला सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असून आर्थिक गरज भागविण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.