गाझियाबाद - व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गाझियाबाद पोलिसांना यश आलं आहे. हे प्रकरण साहिबाबादच्या शालीमार गार्डन परिसरातील आहे. पोलिसांनी विक्रम एन्क्लेव्हमधील फ्लॅटवर छापा टाकून तब्बल १५ जणांना अटक केली आहे. यामध्ये ८ मुली आणि ७ मुलांचा समावेश आहेत. हे रॅकेट बर्याच दिवसांपासून पोलिसांना खबर न लागू देता अत्यंत नियोजित पद्धतीने चालविले जात होते.एक महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती महिला आणि मुलींना पैशाचे आमिष दाखवून गाझियाबाद येथे आणायची आणि नंतर त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात काम करण्यास भाग पाडत असे. दिल्ली आणि गाझियाबादमधील हॉटेलमधील मागणीनुसार नंतर त्यांना पाठवायची. हे रॅकेट सोशल मीडिया आणि व्हॉट्स अॅपद्वारे चालवण्यात येत होत. हे लोक आधी या सोशल मीडिया आणि व्हॉट्स अॅपवरुन आपल्या ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवत असत. नंतर ग्राहकांच्या आवडीनुसार मुलींना ग्राहकांजवळ पाठवले जात असे. शालिमार गार्डनमधील एका कॉम्पलेक्समधून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. देहविक्री करणाऱ्या मुलींना त्या परिसरातील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते. येथे ग्राहक येत असत नाहीतर त्या मुलींना मागणीनुसार हॉटेलवर पाठवले जात असे. अटक करण्यात आलेल्या मुली या पंजाब, उत्तराखंड आणि इतर राज्यातील आहेत. हे सेक्स रॅकेट एक महिला चालवत होती. तिने पोलिसांना चौकशीदरम्यान पतीच्या मृत्यूनंतर आपलं पोट भरण्यासाठी ती हा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. ही महिला दर ६ महिन्यांनी आपला फ्लॅट बदलत असे जेणेकरुन पोलिसांच्या जाळ्यात आपण अडकू नये. तसेच ही आरोपी महिला घरमालकाला फ्लॅटचे भाडेही तीन पट अधिक देत असल्याचं चौकशीत उघड झालं. मुलींना ग्राहकाकडे पाठवायला एका गाडीचीही व्यवस्था करण्यात येत असे. एका ग्राहकाकडून १० ते २५ हजार रुपये घेतले जात असत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : महेश भट्ट यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत
निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का
बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड