व्हॉट्स अॅपवर सेक्स रॅकेट चालवणाऱ्या रांची येथील मायकल जोसेफ उर्फ राजन सिंग आणि शुभाशीष घोष या गुंडांना पोलिसांनीअटक केली आणि तुरुंगात पाठविले. या प्रकरणात पोलिस एका महिलेच्या शोधात धाड टाकत आहेत.लालपूर ठाणेदार अरविंद कुमार म्हणाले की, मायकेल आणि शुभाशीष हे आधीपासूनच मित्र होते. मायकेलने यापूर्वीच शुभाशीषच्या घरी मुली पाठवल्या होत्या. रविवारी रात्री मायकेल मुलींना घेऊन शुभाशीषच्या घरी पोहोचला आणि परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, यापूर्वीही मुली शुभाशीषच्या घरी येताना दिसल्या होत्या. परिसरातील लोकांना संशयास्पद वाटले, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शुभाशीषच्या घरी पोहोचून सर्वांना अटक केली व त्यांना पोलिस ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान मायकेल म्हणाला की, तो व्हॉट्सअॅपवरुन सेक्स रॅकेट चालवत आहे. मुलींचा फोटो व्हॉट्स अॅपवरुन लोकांना पाठवला जातात आणि दर निश्चित केला जातो. मायकल हा सदर पोलिस स्टेशन हद्दीतील ढेला टोली येथील परिसरात रहिवासी आहे.म्होरक्या दोनदा तुरुंगात जाऊन आलायसेक्स रॅकेटचा म्होरक्या मायकेल जोसेफ याला दोनदा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. मायकेल जोसेफचे जेल चौकजवळ एक रेस्टॉरंट होते. पूर्वी तो तेथूनच सेक्स रॅकेट चालवत असे. तुरूंगात गेल्यानंतर मायकेल मोबाईलवरून लोकांशी संपर्क साधत आणि त्यांच्याकडे मुली पाठवत असे. मायकेलने आपल्या सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यांच्या शोधात पोलीस छापा टाकत आहेत.आरोपी हा वेषांतर करण्यात माहीर मायकेल जोसेफ उर्फ राजन सिंग आपला वेषांतर करण्यात माहीर आहे. राजनविरोधात लोअर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने न्यायालयात शरणागती पत्करली. शरणागती पत्करण्याच्या वेळी आरोपी पोलिसातून सुटण्यासाठी महिलेच्या वेषात कोर्टात पोहोचला.कोलकाता आणि ओडिशामधून मुली आणतातलालपूर पोलिसांनी सांगितले की, चौकशीच्या वेळी मायकेलने सांगितले त्याने कोलकाता आणि ओडिशा येथील मुलींना रांची येथे आणले. ही टोळी गेली 7 ते 8 वर्षे कार्यरत आहे. त्याच्या टोळीत 1000 हून अधिक मुली आहेत.
खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार
नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल
अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी