शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अनेक तरुणींचे शोषण केले, नऊ जणींना फूस लावून पळवले; ५ लाखांचे बक्षीस असलेला लव्हगुरू अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 3:50 PM

सोशल मीडियावर लव्हगुरू म्हणून कुख्यात असलेल्या या आरोपीला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र तो नंतर पॅरोलवर सुटून पसार झाला होता.

ठळक मुद्देपेशाने शिक्षक असलेल्या या तथाकथित लव्हगुरूचे नाव धवल त्रिवेदी सीबीआयने त्याच्या नावावर ठेवले होते पाच लाख रुपयांचे ईनाम हिमाचल प्रदेशमधील बद्दी परिसरातून पोलिसांनी आवळल्या त्याच्या मुसक्या

नवी दिल्ली - अनेक तरुणींचा लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नऊ जणींना फूस लावून पळवणाऱ्या कुख्यात लव्हगुरूला दिल्ली पोलिसांच्या क्राइमब्रँच आणि इंटरस्टेट सेलने अटक केली आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथून अटक करण्यात आली. पेशाने शिक्षक असलेल्या या तथाकथित लव्हगुरूचे नाव धवल त्रिवेदी असून, त्याच्या कारनाम्यांमुळे सीबीआयने त्याच्या नावावर पाच लाख रुपयांचे ईनाम ठेवले होते.सोशल मीडियावर लव्हगुरू म्हणून कुख्यात असलेल्या धवल याला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र तो नंतर पॅरोलवर सुटला होता. धवल त्रिवेदी याने अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. तर ९ महिलांना त्याने आपल्या प्रेमपाशात ओढून पळवून नेले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. त्रिवेद हा २०१८ पासून फरार होता. मुंबई सीबीआयने त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.धवल हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याला आपल्या गुन्ह्याबाबत अजिबात खेद नाही आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, मी एक पुस्तक लिहिण्याचा विचार करत असून, त्याचे नाव १० परफेक्ट वुमन इन माय लाइफ असे ठेवणार आहे. गुजरातमधील राजकोट पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल खटल्यामध्ये धवल त्रिवेदी याला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर तो पॅरोलवर फरार झाला होता.नंतर त्याच्या शोधासाठी तपास मुंबई सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या काळात तो नाव बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन आरोपीबाबत गोळा केलेली माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी अखेरीस हिमाचल प्रदेशमधील बद्दी परिसरात आरोपीचे लोकेशन पकडले. त्यानंतर इन्स्पेक्टर नीरज चौधरी आणि एससीपी संदीप लांबा यांच्या पथकाने हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतSexual abuseलैंगिक शोषण