"महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढवणारे कपडे परिधान केले"; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:40 PM2022-08-17T13:40:58+5:302022-08-17T13:46:45+5:30
तक्रारकर्त्या महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढविण्यासारखे कपडे परिधान केले होते
कोझीडोक - केरळमधील एका न्यायालयात लैंगिक शोषण पीडित प्रकरणातील एका सुनावणीवेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता असलेल्या सिविक चंद्रन यांना अंतरित जामीन देताना न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. भादंविच्या कलम 354 अन्वये गुन्हा प्रथमदर्शनी दिसून येत नाही, जेव्हा महिल लैंगिक उत्तेजक कपडे परिधान करते, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. याप्रकरणी, 74 वर्षीय आरोपीने महिलेचा फोटोही न्यायालयात सादर केला होता.
तक्रारकर्त्या महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढविण्यासारखे कपडे परिधान केले होते. त्यामुळे, प्रथम दर्शनी याप्रकरणात आरोपीविरुद्ध 354 अन्वये गुन्हा दाखल करत येणार नाही. कलम 354 म्हणजे आरोपीकडून महिलेला लज्जा वाटेल असे वर्तन करणे हे स्पष्ट आहे. लैंगिक शोषण आणि त्यासंबंधी दंडांचे प्रावधान हे 354 कलम आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, कलम 354 लागू करण्यासाठी शारिरीक संपर्क आणि स्पष्टपणे लैंगिक छळ केल्याचे किंवा लैंगिक रंगावरुन टिपण्णी, लैंगिक सुखाची मागणी केल्यासंदर्भात भाष्य असाव लागते.
दरम्यान, याप्रकरणी तक्रारदार महिलेने आरोप ठेवला होता की, आरोपीने तक्रारदार महिलचा तोंडी स्वरुपात आणि शारिरीक पद्धतीने लैंगिक छळ केला आहे. जी महिला एक तरुण लेखिका असून 2020 मध्ये नदी समुद्रकिनारी आयोजित एका शिबीरमध्ये तिचा लाजवेल असे वर्तन आरोपीने केले होते. त्यानंतर, कोयिलांडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि 354 (ए),341 आणि 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीच्यावतीने वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना, हा केवळ प्रतिशोध भावनेतून दाखल करण्यात आलेला गुन्हा आहे, असा युक्तीवाद केला होता. तसेच, तक्रारकर्त्या महिलेने आपल्या प्रियकरासोबतचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये, समुद्रकिनारी ते दोघेही बसल्याचे दिसून येते, असेही त्यांनी कोर्टात सांगितले.