शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

क्रूरपणाचा कळस! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार; लाकूड घुसवून डोळे फोडले अन्…

By प्रविण मरगळे | Published: January 13, 2021 8:52 AM

मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, पीडित कुटुंबाच्या माहितीनुसार, बिहार बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी मुलगी बोलण्यास आणि ऐकण्यास असमर्थ आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांना तातडीने उमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला उपचारासाठी दाखल केलेमुलीच्या एका डोळ्यात लाकूड घुसवून तिचा डोळा फोडण्यात आला आहेया बलात्कारात सहभागी असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे

बिहार – राज्यातील मधुबनी जिल्ह्यात चारा घेण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीसोबत काही जणांना सामूहिक बलात्कार केल्याची निर्दयी घटना घडली आहे. इतकचं नाही तर या घटनेनंतर ओळख लपवण्यासाठी लाकडाच्या तुकड्याने मुलीचे डोळे फोडण्यात आले आणि अशाच अवस्थेत तिला फेकून फरार झाले, या मुलीला दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, पीडित कुटुंबाच्या माहितीनुसार, बिहार बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी मुलगी बोलण्यास आणि ऐकण्यास असमर्थ आहे. मंगळवारी दुपारी ती शेळ्यांसाठी चारा आणि जळणासाठी लाकडं आणायला जवळच्या मनहरपूर गावाच्या नदीकिनारी गेली होती. त्याचवेळी काही क्रूर लोकांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलगी खूप उशीर झाला तरी घरी पोहचली नाही म्हणून तिला शोधण्यासाठी कुटुंबातील लोक बाहेर पडले, तेव्हा एका बागेत मुलगी नग्न स्थितीत बेशुद्ध अवस्थेत सापडली.

कुटुंबीयांना तातडीने उमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला उपचारासाठी दाखल केले, तेथे डॉ. अजितकुमार सिंग यांनी तिच्या उपचार केले, आणि प्रकृती गंभीर असल्याने तिला मधुबनी सदर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवले. सध्या मधुबनी सदर रूग्णालयातून मुलीला दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. मुलीची प्रकृती गंभीर आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या एका डोळ्यात लाकूड घुसवून तिचा डोळा फोडण्यात आला आहे. तर दुसऱ्या डोळ्याचीही दृष्टी जाण्याचा धोका आहे. याशिवाय डोळ्यांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. हरलाखी पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रेमलाल पासवान म्हणाले की, या बलात्कारात सहभागी असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याचं नाव लक्ष्मी मुखिया असं आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या घटनेच्या वेळी नदीकडून येताना त्याला पाहिले होते आणि त्याच्या कपड्यांवर, शरीरावर माती आणि गवत लागल्याचं दिसलं होतं, संशयिताकडून सखोल तपास सुरू आहे आणि अन्य आरोपींची नावे समजताच त्यांनाही तातडीने अटक करण्यात येईल.  

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस