उदगीर (जि.लातूर) : साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केला, शिवाय ९ लाख रुपये घेऊन लग्नाला नकार दिल्याची घटना उदगीर शहरात घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील वास्तव्याला असलेल्या १७ वर्षीय मुलीसोबत राहुल अशोक केंद्रे आणि शुभम अशोक केंद्रे यांनी एप्रिल २०२३ ते १८ जून २०२४ दरम्यान संगनमत करून सोयरीक केली. त्यानंतर, घरबांधकाम करायचे आहे, असे म्हणून मुलीची आई आणि नातेवाइकांकडून ९ लाख रुपये घेतले. साखरपुड्याचा कार्यक्रम माेठा करण्यास भाग पाडले. या माध्यमातून एकूण ११ लाख रुपये विश्वासघात करून उकळले. साखरपुड्यानंतर राहुल याने मुलीला ‘आता मी तुझा होणारा पती आहे,’ असे म्हणून तिच्यावर अत्याचार केला. लग्नाला नकार देत पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची फसवणूक केली.
याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीनंतर राहुल अशोक केंद्रे (फौजी) (ता.उदगीर जि.लातूर), शुभम अशोक केंद्रे (रा.केकत शिंदगी ता.कंधार जि.नांदेड) यांच्याविराेधात कलम ४०६, ४२०, ३७६ भादंविसह कलम ४, ८, १७ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक आर.के. मुंढे हे करीत आहेत.